गोवा

परप्रांतीय तरुणीला मारहाणीची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

Dainik Gomantak

पणजी,

गेल्या आठवड्यात पर्वरी येथे सकाळच्या मॉर्निंग वॉकवेळी उत्तर भारतातील तरुणीला पर्वरी येथील एका महिलेने धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेतल्यानंतर पर्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली आहे व त्यानंतर तिची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथील पोलिस कॉलनीच्या परिसरात सिक्कीम व नेपाळ येथील चार तरुणी राहतात. गेल्या १७ तारखेला त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पदपथावरून चालत जात असताना सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेने त्यांना हटकले व जाब विचारला. त्यांना घरात बसण्यास सांगितले. यावेळी त्यातील तीन तरुणांनी घाबरूनच तेथून पळ काढला, तर एका तरुणीला या महिलेने पकडून धक्काबुक्की केल्याने ती जखमी झाली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एकाही स्थानिक व्यक्तीने यात हस्तक्षेप करून अडविण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी तरुणीविरुद्ध जातीवाचक विधाने करण्यात आली असा दावा करण्यात आला होता मात्र याप्रकरणी केलेल्या चौकशीत तसे काही घडले नाही असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.
ही घटना घडली त्याचे चित्रीकरण पीडित तरुणीला ओळखणाऱ्या एका व्यक्तीने केले व ते फेसबुवकर अपलोड केले होते. मात्र या फेसबुकवर अपलोड केलेल्या चित्रीकरणात उत्तर भारतीय तरुणीला पोलिस कॉलनीत राहत असलेल्या महिलेने व तिच्या दोन मुलींनी बेदम मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी तक्रार देण्यास गेलेल्या तरुणीची स्थानिक पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही व उलट तिला धाक दाखवून तेथून पळवून लावण्यात आले. या घटनेची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून या तरुणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती पावले उचलण्यात आली आहेत अशी विचारणा ट्विटवरून केली होती.
आयोगाने केलेल्या या ट्विटनंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती व तक्रार दाखल करून घेतली. यासंदर्भात पर्वरी पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की तक्रार दाखल करण्यात आली होती व योग्य ती कारवाई झाली आहे. सोशल मिडिया फेसबूकवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे त्यामध्ये काहीच तथ्य नाही व पीडित तरुणीनेही तसे काही घडले नाही असे स्पष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेला पोलिस प्राधान्य देत असल्याचे पर्वरी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT