National Theater  Dainik Gomantak
गोवा

National Theater : नॅशनल थिएटर धोकादायक! इमारतीला ठोकले टाळे

National Theater : महानगरपालिकेने लावली नोटीस

गोमन्तक डिजिटल टीम

National Theater :

पणजी महानगरपालिकेच्या जागेत उभ्या असलेल्या नॅशनल थिएटरची इमारत जीर्ण झाली असून, धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने गुरुवारी चिकटवली आहे. शिवाय इमारतीला टाळे ठोकण्याचे सोपस्कारही पूर्ण केले.

नॅशनल थिएटर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेत उभे आहे. थिएटर मालक व महानगरपालिकेचा करार यापूर्वीच संपुष्टात आला आहे. परंतु अद्यापही याचा पूर्णतः ताबा महानगरपालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सरकारी दरबारी प्रलंबित आहे.

त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही इमारत धोकायदायक असल्याची नोटीस बजावण्याचे सोपस्कार आज महानगरपालिकेने पूर्ण केले. महानगरपालिकेच्या मागील अनेक मासिक बैठकांत नॅशनल थिएटरचा प्रश्‍न चर्चेला आला होता, पण आता तो मागे पडला आहे.

नॅशनल थिएटरविषयी सतत प्रश्‍न विचारणारे सुरेंद्र फुर्तादो हे सध्या मौन बाळगून आहेत. मागील मासिक बैठकीला ते हजर नव्हते, त्यामुळे नॅशनल थिएटरचा विषय मागे पडल्याचेच दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT