Margao Dainik Gomantak
गोवा

National Science Day : मडगावच्या ‘पॉप्युलर’मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

National Science Day : मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विज्ञान दिनाचे औचित्य साधून आंतरविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

National Science Day :

सासष्टी, मडगाव येथील पॉप्युलर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वीज अभियंता नितांत खोलकर, विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अवधुत पर्रीकर, व्यवस्थापक सचिन भांडारे, मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विज्ञान दिनाचे औचित्य साधून आंतरविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेत परपेच्युअल हायस्कूल विजयी ठरले तर रवींद्र केळेकर हायस्कूल हे उपविजयी ठरले.

सर्व विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच मुख्याध्यापिकांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शनही यावेळी करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित नृत्य सादर केले तसेच ‘प्लास्टिकचा भस्मासुर’ याविषयावर नाट्य सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Altinho: आल्‍तिनोतील सरकारी निवासस्‍थानांचे कार्यालयांमध्‍ये रूपांतरण! CCTV, सुरक्षा रक्षक नसल्‍याने प्रश्‍‍न ऐरणीवर; कुटुंबीयांत धास्‍ती

Goa Mining: खाण लीजमधील जमीनमालकांना 'सरकार'चाच आधार! कायद्यानुसार मोबदला देण्‍याची तरतूद; आधारभूत किंमतीचा पर्याय

Goa Live Updates: ‘विवेकानंद भवन’चे 11सप्टेंबर रोजी लोकार्पण

Goa Politics: खरी कुजबुज; पाचव्या मृत्यूने गूढ वाढले

Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

SCROLL FOR NEXT