National Games Goa 2023
National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: 'अमेरिका रिटर्न' आकांक्षाची अपेक्षापूर्ती! महिला स्क्वॉशमध्ये विजेती

Kishor Petkar

National Games Goa 2023: गोव्यासाठी सुवर्णपदकाचे ध्येय बाळगून ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी अमेरिकेहून खास आलेल्या आकांक्षा साळुंखेने रविवारी अपेक्षापूर्ती केली. महिला स्क्वॉशमध्ये न्यूयॉर्क येथे प्रशिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.

चिखली-वास्को येथील क्रीडा संकुलातील स्क्वॉश कोर्टवर झालेल्या अंतिम लढतीत आकांक्षाने तमिळनाडूच्या पूजा आरती हिला ३-० (११-५, ११-४, ११-३) असे लीलया हरविले. गोव्याचे हे स्पर्धेतील ११ वे सुवर्णपदक ठरले. अन्य १२ रौप्य व २६ ब्राँझसह यजमानांच्या खाती एकूण ४९ पदके जमा झाली आहेत.

वास्कोतील नौदलाच्या शाळेत शिक्षण पूर्ण केलेली आकांक्षा हिला गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी निमंत्रित केले होते. त्यानुसार तिने स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकून विश्वास सार्थ ठरविला, असे तिचे वडील कमांडर हेमंत साळुंखे यांनी सांगितले. स्क्वॉश खेळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिळालेले गोव्याचे पहिले सुवर्णपदक ठरले. अमेरिकास्थित आकांक्षाने रविवारी प्रतिस्पर्धी खेळाडूस सावरण्याची संधीच दिली नाही.

गोव्याच्या मदतीस महिला बळ

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील गोव्याच्या ११ सुवर्णपदकांत पाच वैयक्तिक आहेत. यामध्ये तीन सुवर्णपदके महिलांनी, तर दोन पुरुषांनी पटकावली आहे. महिलांत आकांक्षाव्यतिरिक्त करिना शिरोडकर (पेंचाक सिलाट) व रोदाली बरुआ (तायक्वांदो) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत.

गोव्यासाठी सुवर्णपदक जिंकल्यामुळे मी खूप आनंदित आहे. हे पदक साऱ्या गोमंतकीयांसाठी आहे. मी गोव्यातच वाढलेली आहे, त्यामुळे राज्यासाठी कामगिरी खास आहे.
आकांक्षा साळुंखे, स्क्वॉशमधील सुवर्णपदक विजेती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

SCROLL FOR NEXT