National Games Goa 2023 | P Anand with Gold Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: सुवर्णपदके जिंकणारा आनंद राज्यात उपेक्षित! गोव्यात अजूनही नोकरीच्या शोधात

Kishor Petkar

National Games Goa 2023: आनंद पंडियाराजन याने शुक्रवारी फोंडा क्रीडा संकुलात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदोत गोव्यासाठी सुवर्णपदक जिंकले आणि राज्य क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत तीन सुवर्णपदके जिंकणारा तो गोव्याचा पहिला क्रीडापटू ठरला.

मात्र देदीप्यमान कामगिरी बजावूनही तो राज्यात नोकरीबाबत उपेक्षित असून रोजगारासाठी त्याला गुजरातचा रस्ता धरावा लागला, तेथे तो कंत्राटी पद्धतीवर तायक्वांदोतील प्रशिक्षक आहे.

‘‘सध्या मी ३३ वर्षांचा आहे. राज्यासाठी क्रीडा मैदानावर यशस्वी कामगिरी बजावली, परंतु नोकरीसाठी वणवण कायम आहे. गुजरातमध्ये कंत्राटी पद्धतीची नोकरी आहे. कायमस्वरूपी शाश्वती नाही. आता मी राज्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक जिंकले, पण नोकरीबाबत काही आश्वासक नाही.

भविष्याची चिंता सतावते. राज्य सरकारकडे मी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण पदरी निराशाच आली,’’ असे आनंद म्हणाला. सुवर्णपदकाचा जल्लोष होत असताना आपण राज्यात बेरोजगार असल्याची खंत तिला सतावत होती. १९९८ पासून आनंद गोव्याचे तायक्वांदो खेळात प्रतिनिधित्व करत आहे.

गोव्याचा यशस्वी क्रीडापटू

गोमंतकीय तायक्वांदो खेळातील यशस्वी नाव म्हणजे आनंद पंडियाराजन. आनंदने २०११ मध्ये झारखंडमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, नंतर २०१५ मध्ये केरळ येथील स्पर्धेतही तोच सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. गोव्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकण्याचा आगळा पराक्रम आनंदच्या नावे नोंदीत झाला. त्यात त्याने शुक्रवारी वयोगट बदलूनही तिसऱ्या सुवर्णपदकाची भर टाकली.

भारताचेही प्रतिनिधित्व

आनंदने भारताचे दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. असा पराक्रम करणारा तो पहिला गोमंतकीय क्रीडापटू आहे. २०१० साली चीनमधील ग्वांग् चौऊ येथील आणि २०१४ साली दक्षिण कोरियातील इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत तो भारतीय तायक्वांदो संघातून खेळला. गोवा सरकारने त्याच्या कार्याची दखल घेऊ त्याला २०१५-१६ मध्ये दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT