Babu Gaonkar  Dainik Gomantak
गोवा

National Games 2023: मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याच्या खेळाडुंनी गाजवला दिवस; सुवर्ण, रौप्यसह कांस्यपदकाचीही कमाई...

Akshay Nirmale

37th National Games 2023: गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरूवारीमॉडर्न पेंटॅथलॉन या क्रीडा प्रकारात गोव्याच्या खेळाडुंनी दिवस गाजवला. या क्रीडा प्रकारात गोव्यात एकूण तीन पदकांची कमाई केली.

यात बाबू गावकर याने सुवर्णपदकाची कमाई करत गोव्यासाठी या स्पर्धेतील पहिले गोल्डमेडल मिळवले.

Goa Modern Pentathalon Silver medal winner team

बाबू गावकर हा नेत्रावळी-सांगे येथील असून त्याने मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये पुरुष गटात लेझर रन प्रकारात अव्वल कामगिरी नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. लेझर रन प्रकारात 600 मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. फोंडा क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली.

दरम्यान, दुपारी मॉडर्न पेंटॅथलॉनच्या लेझर रिले प्रकारात बाबू गावकर आणि सीता गोसावी यांनी राज्याला रौप्य पदक मिळवून दिले. सुवर्ण जिंकलेल्या बाबूने रौप्यपदक जिंकण्यातही मोलाचे योगदान दिले.

तर त्यानंतर गोव्याच्या नेहा गांवकर, सीता गोसावी, योगिता वेळीप यांनी कांस्य पदकाची कमाई केली. अशाप्रकारे मॉडर्न पेंटॅथलॉनमधील विविध प्रकारांमध्ये गोव्याने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT