National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: तायक्वांदोत गोव्याला दोन सुवर्णपदके

राज्याने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदकांना गवसणी घातली

Kishor Petkar

National Games Goa 2023: गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो खेळास वगळण्यात आले होते, परिणामी गोव्याला पदके हुकली होती. गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या खेळाने पुनरागमन केले आणि राज्याने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदकांना गवसणी घातली.

स्पर्धा फोंडा क्रीडा संकुलात झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात राज्यासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकताना आनंद पंडियाराजन याने ८७+ किलो वजनगटात बाजी मारली. आनंदने हरियानाच्या आर. प्रीतम याच्यावर मात केली.

पुरुष गटात गोव्याला ८० खालील किलो वजन गटात रौप्यपदही मिळाले. सर्वन कुमार याने हे पदक पटकावले. त्याला अंतिम लढतीत दिल्लीच्या शिवांश त्यागी याने हरविले. महिला गटातही गोव्याची सरशी झाली. रोदाली बरुआ हिने ७३+ किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले. तिने कर्नाटकच्या व्ही. प्रावालिका कुस्तगी हिच्यावर मात केली. (Goa Won Gold in Taekwondo)

तायक्वांदो स्पर्धेत शुक्रवारी गोव्याला पाठिंबा देण्यासाठी फोंडा क्रीडा संकुलात पाठिराख्यांचा मोठा गट उपस्थित होता. आनंदने लौकिकास साजेशी कामगिरी करताना उपस्थितांनी निराश केले नाही. यापूर्वी तो ८० किलो वजनगटात खेळत असे, आता वजनगट वाढूनही त्याने सुवर्णविजेत्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. यापूर्वी त्याने २०११ व २०१५ मधील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१५ साली रौप्यपदक जिंकलेल्या सर्वन कुमार याने दुसऱ्यांदा रुपेरी कामगिरी बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT