Campal Ground Dainik Gomantak
गोवा

Panaji News : पंधरा दिवसांनंतरही कांपाल मैदान अस्वच्छ

Panaji News : स्पर्धेचा समारोप ९ नोव्हेंबरला झाला, पंधरा दिवस ओलांडून गेले तरी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) मैदानावरील कचरा काही हटलेला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा क्रीडा स्पर्धेसाठी कांपाल मैदानावर ‘क्रीडा ग्राम''साठी शामियाने उभारले गेले होते. स्पर्धेचा समारोप ९ नोव्हेंबरला झाला, पंधरा दिवस ओलांडून गेले तरी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) मैदानावरील कचरा काही हटलेला नाही.

अजूनही मैदानावर ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खो-खो, कबड्डी अशा खेळांसाठी साग मैदानावर खास तंबू उभारून कृत्रिम मैदानांची निर्मिती केली गेली होती.

ऐन क्रीडा स्पर्धेत स्पर्धेसाठी ज्या कंत्राटदारांनी साहित्य पुरविले होते, त्यांचे काही साहित्य अजूनही मैदानावर पडलेले आहे. परंतु मैदानाची तत्काळ स्वच्छता होणे अपेक्षीत होते, ते काम मात्र झालेले नाही.

मैदानावर दररोज पहाटे व्यायामासाठी पणजी व ताळगाव परिसरातील नागरिक येत असतात. परंतु मैदानावरील कचरा न हटल्याने तेथे चालणे योग्य नाही.

शामियाना उभारण्यासाठी व इतर कामांसाठी खिळे किंवा इतर लोखंडी वस्तूही पडलेल्या असू शकतात, त्यामुळे नागरीकही मैदानावर जाणे पसंत करीत नाहीत. याशिवाय मैदानावर क्रिकेटचे सामनेही होत असतात, त्याशिवाय मैदानाच्या बाजूला अनेक क्रिकेटपटून नेटमध्ये सरावही करीत असतात.

मैदानावर सामने आयोजन करण्यासाठी मैदान सुयोग्य होणे आवश्‍यक आहे. मैदानावर दररोज सरावासाठी येणाऱ्या अनेक खेळाडूंची या अस्वच्छतेमुळे निराशा झालेली आहे. ज्यांना मैदानावर साहित्य पुरविण्याचे काम मिळाले होते, ते-ते कंत्राटदार निवांतपणे साहित्य उचलून नेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT