दोनापावल-पणजी: गोव्यात नारळ आणि नारळाच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. नारळ असो वा काजू, शेतकऱ्यांनी अधिकाधिक लागवड केली पाहिजे, जेणेकरून भावी पिढ्यांना त्याचा फायदा होईल, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
'गोमन्तक'ने गोवा राज्य सरकारच्या सहकायने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नारळ परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या एकदिवसीय राष्ट्रीय नारळ परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक, तामिळनाडूचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री एम.आर. के. पनीरसेल्वम, सीसीएआरआय प्रवीण कुमार, सकाळ समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, 'गोमन्तक'चे संपादक संचालक राजू नायक आणि मान्यवरांची उपस्थिती होती. या परिषदेला सकाळ समूहाचे कृषी वर्तमानपत्र 'अॅग्रोवन'चे सहकार्य लाभले आहे.
नारळ शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन
समुद्रकिनाऱ्यांवरील मोठमोठे माड ही गोवा राज्याची ओळख आहे. गोवा हे लहान राज्य असले तरी, राज्य सरकारचे फलोत्पादन महामंडळ भाजीपाल्यापासून नारळ उत्पादक शेतकन्यांपर्यंत सर्वांना मदत करते. फलोत्पादन महामंडळ नारळाला हमीभाव देत असून, त्याचा नारळ उत्पादकांना निश्चित फायदा होत आहे. आम्ही अधिकाधिक शेतकऱ्यांना नारळ शेती करण्यासाठी प्रोत्साहीत करतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
नारळ उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आकर्षण
नारळ उत्पादनाचे घटते प्रमाण यावर विचारमंथन व्हावे, या उद्देशाने 'गोमन्तका ने आयोजिलेल्या राष्ट्रीय नारळ परिषदेत विविध संस्थांनी नारळ उत्पादनांविषयी प्रदर्शन भरवले होते. या दालनांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषिमंत्री रवी नाईक, नारळ उत्पादक शेतकरी, कृषितज्ज्ञ, अभ्यासक यांनी भेट देत विविध उत्पादनांची माहिती जाणून घेतली. उत्पादने खरेदी केली, विविध नारळाच्या उत्पादनांची माहिती मिळविली. प्रदर्शनात ठेवलेल्या विविध नारळांच्या कवाथ्याची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली
तामिळनाडूत ४५ हजार कोटींची तरतूद
तामिळनाडू राज्य गोव्याच्या तुलनेत फार मोठे आहे. या राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने ४५ हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी काजू, नारळ, डाळींसह भाजीपाला उत्पादनात अधिक भरीव कामगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा दिला आहे, असे तामिळनाडूचे कृषिमंत्री पनीरसेल्वम यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.