Parra Dainik Gomantak
गोवा

Parra News : राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत‘हेडगेवार’चे प्रकल्प

Parra News : गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांनी या परिषदेत निरनिराळे प्रकल्प गोवा पातळीवर सादर केले होते. त्यातील केवळ आठ प्रकल्पाची निवड राष्ट्रीय परिषदेसाठी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Parra News :

पर्ये, गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान मंडळ, साळगाव व राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान संचार मंडळ, दिल्ली यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ३१ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये साखळीच्या डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाची विद्यार्थिनी मनस्वी नंदा माजीक व वरदा वळवईकर यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची निवड करण्यात आली.

गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांनी या परिषदेत निरनिराळे प्रकल्प गोवा पातळीवर सादर केले होते. त्यातील केवळ आठ प्रकल्पाची निवड राष्ट्रीय परिषदेसाठी करण्यात आली.

मनस्वी नंदा माजिक व वरदा वळवईकर यांनी ‘कॉमन सीन ओडोनेट्स फाउंड इन सत्तरी’ हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पासाठी केरी सत्तरीतील येथील आजोबाची तळी, वाळवंटी नदी व शेतामधील परिसर येथे प्रामुख्याने सापडणाऱ्या (चतुरंग ) भिरमुंडी यावर अभ्यास केला आहे.

या प्रकल्पासाठी केपे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदेश गावस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या प्रकल्पाच्या ‘फिल्ड वर्क’साठी नंदा माजीक व मीनल पाटील यांचे सहकार्य लाभले.

हा प्रकल्प भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत मनस्वी नंदा माजीक सादर करणार आहे. विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास केरकर, पीटीए, मुख्याध्यापक सदानंद मिशाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT