Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बस प्रवासात पळवली रिव्हॉल्वर, नाशिक ते मडगाव मार्गावरील घटना; अज्ञात प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Crime News: नाशिक ते मडगावदरम्यान बस प्रवासात अज्ञात चोरट्याने व्यावसायिक विक्रांत साळस्कर (५८) यांच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्वर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे

Sameer Panditrao

नाशिक: नाशिक ते मडगावदरम्यान बस प्रवासात अज्ञात चोरट्याने व्यावसायिक विक्रांत साळस्कर (५८) यांच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्वर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विक्रांत साळस्कर यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, भा.न्या.सं.च्या ३०५(ब) कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

साळस्कर हे मूळ मडगावातील कोंब येथील असून, सध्या नाशिक येथे राहतात. त्यांच्यानुसार, चोरीची घटना मागील वर्षी १३ डिसेंबरला नाशिक-मडगाव बस प्रवासादरम्यान घडली. अज्ञात चोरट्याने प्रवासादरम्यान त्यांचा रिव्हॉल्वर पळवून नेल्याचे विक्रांत यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मालमत्ता चोरीसंदर्भातील गुन्हा महाराष्ट्र राज्यातील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, पुढील तपास आणि अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी हा प्रकरण संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून प्राथमिक चौकशी सुरू केली असून, बसमधील सीसीटीव्ही रेकॉर्ड्स आणि प्रवाशांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, प्रवासादरम्यान आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घेण्याची सूचना दिली आहे. याशिवाय, परवानाधारक असलेल्या शस्त्रसामग्रीसाठी योग्य सुरक्षा उपाय अवलंबणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मडगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याला ताब्यात घेण्यासाठी सखोल तपास सुरु केला असून, नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवरून पुढील कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. साळस्कर यांचा विश्वास आहे की पोलिस तपासामध्ये लवकरच तो रिव्हॉल्वर परत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT