naru worm goa Dainik Gomantak
गोवा

Naru Disease: गोवेकरांनो सावधान! फोंड्यात आढळला धोकादायक ‘नारू’? 25 वर्षांपूर्वी झाला होता देशातून नष्‍ट

Goa Ponda Naru Disease: पंचवीस वर्षांपूर्वी भारतातून नष्‍ट करण्यात आलेला ‘नारू’ नामक सुतासारखा पांढरा लांबलचक जंतू येथील खांडेपारमध्ये दृष्टीस पडल्याने खळबळ उडाली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: पंचवीस वर्षांपूर्वी भारतातून नष्‍ट करण्यात आलेला ‘नारू’ नामक सुतासारखा पांढरा लांबलचक जंतू येथील खांडेपारमध्ये दृष्टीस पडल्याने खळबळ उडाली आहे. येथील पर्यावरणप्रेमी तथा आरटीआय कार्यकर्ते संदीप पारकर यांच्या घराजवळ हा धोकादायक जंतू आढळला असून त्‍यासंबंधीची माहिती आरोग्य खात्याला देण्यात आली आहे.

फेब्रुवारी २००० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ‘नारू’ हा जीव भारतातून नष्‍ट झाल्‍याचे प्रमाणित केले होते. मात्र हा जंतू खांडेपार-फोंडा येथे आढळून आला आहे. या जंतूचा प्रादुर्भाव पाण्यातून होतो.

त्‍यामुळे पाणी गाळून तसेच उकळूनच प्यायले पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. एक मीटरपेक्षा जास्त लांबीचा हा सुतासारखा जंतू असून आरोग्यासाठी तो धोकादायक आहे. दरम्यान, फोंडा आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांनी या जंतूची अधिक माहिती घेण्यासाठी तज्ज्ञांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

तर, कदाचित पावसामुळे हा कृमी वाहून आपल्या घराजवळ आला असावा, असे संदीप पारकर यांनी सांगितले. जोरात आलेल्या पावसामुळे तो वाहूनसुद्धा गेला अशी माहिती देण्यात आली.

हा जंतू पोटात गेल्‍यास काय होते?

गोल कृमी वर्गातील या जंतूमुळे होणाऱ्या रोगाला ‘ड्रॅंक्यूक्यूलस मेडिनेन्सिस’ असे म्हणतात. या कृमीला ‘गिनी वर्म’ या नावाने ओळखले जाते. मराठीत त्याला ‘नारू’ असेही म्हटले जाते. पिण्याच्या पाण्याबरोबर या जंतूची अंडी पोटात गेल्यास पायाला जखम करूनच हा सुतासारखा कृमी जीव बाहेर येतो. एवढे भयानक स्वरूप या रोगाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

अग्रलेख: गोव्यातील वाढती 'गुन्हेगारी' हा चिंतेचा विषय! प्रशासन आता तरी जागे होईल का?

SCROLL FOR NEXT