Nanoos Fort Dainik Gomantak
गोवा

Goa News: सत्तरीतील क्रांतीला हवी राष्ट्रीय मान्यता

Goa News: समितीची मागणी : नाणूस किल्ला, सत्तरीच्या इतिहासाचे संवर्धन होणे गरजेचे

दैनिक गोमन्तक

Goa News: कुंकळ्ळीच्या 1583 च्या स्वातंत्र्यसंग्रामाला ज्या पद्धतीने गोवा सरकारने राष्ट्रीय मान्यता देऊन तेथे जे स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले, त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित केले आहे. अगदी त्या पद्धतीने सत्तरी तालुक्यातही राणे समुदाय आणि जनतेने जे असंख्य स्वातंत्र्यसग्राम पोर्तुगिजांविरोधात केले त्यांनाही राष्ट्रीय मान्यता मिळणे आवश्यक आहे.

यात प्रामुख्याने सन 1852 ची क्रांतिवीर दीपाजी राणेंनी नाणूस किल्ल्यावरती पोर्तुगिजांविरोधात केलेली क्रांती व अडवईच्या दादा राणेंनी 1885 साली केलेली क्रांती यांचा उल्लेख आहे. सत्तरी तालुक्याचा मोठा इतिहास आहे. आजपर्यंत अनेक नेते, क्रांतिकारांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले मोठे योगदान दिले आहे. मात्र, गोवा मुक्त होऊन 60 पूर्ण झाली तरी सत्तरीतील इतिहासाचे संवर्धन झालेले नाही.

सत्तरी इतिहास संवर्धन समिती या संस्थेने गेल्या 8 वर्षांपासून सत्तरी तालुक्यात व गोव्याच्या इतर भागांत मोठी चळवळ उभी करून सत्तरीचा इतिहास व प्रामुख्याने नाणूस किल्ला प्रकाशझोतात आणला.

नाणूस किल्ल्यावर दर वर्षी सत्तरी संवर्धन समितीतर्फे 26 जानेवारीला क्रांतिदिन साजरा करण्यात येतो. सत्तरीचा इतिहास टिकून राहण्यासाठी या किल्ल्याचे संवर्धन तसेच सत्तरीतील इतर सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचे दालन होणे आवश्यक आहे. सरकार दरबाची आजपर्यंत अनेक निवेदने दिलेली आहेत. या किल्ल्याच्या संवर्धनाची जी फाइल सरकार दरबारी पडून आहे त्या कायदेशीर अचडणी आहेत. त्या सरकारने व सरकारी अधिकाऱ्यांनी दूर करायच्या आहेत.

- ॲड. शिवाजी देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Goa Live News: 56th IFFI ईफ्फीत दिसलो सनी देवोलाचो हमशकल; Watch Video

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT