Nano Banana Trend CM Pramod Sawant: सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो आणि व्हिडिओ तयार करण्याचा ट्रेंड सुरू आहे. या नव्या डिजिटल लाटेत आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाही समावेश झालाय. गुगलच्या एका लोकप्रिय एआय टूलच्या मदतीने तयार करण्यात आलेले त्यांचे आकर्षक 3D फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने आणि मुख्यमंत्र्यांच्या विविध फॅन पेजेसनी हा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तो नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनतोय.
या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा चेहरा अत्यंत सुस्पष्ट आणि जिवंत दिसतोय. चेहऱ्यावरील हावभाव, कपड्यांवरील बारीक तपशील आणि फोटोची पार्श्वभूमी या सर्व गोष्टी 3D मॉडेलमध्ये अचूकपणे टिपल्या गेल्यात.
फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांना एका वेगळ्याच रूपात पाहिल्याने त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा फोटो तयार करण्यासाठी 'नॅनो बनाना' या नावाने प्रसिद्ध असलेल्या गुगलच्या एआय टूलचा वापर करण्यात आला आहे.
भाजप गोवाने हा फोटो शेअर करताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचा गौरव केला. पायाभूत सुविधा, शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून गोव्याचे भविष्य घडवणारे मुख्यमंत्री, असा संदेश या फोटोसोबत देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्र्यांच्या फॅन पेजेसनीही हा फोटो शेअर करताना त्यांना 'प्रगतीचे शिल्पकार' आणि 'लोकनायक' म्हणून संबोधले आहे.
एका सामान्य फोटोचे काही सेकंदांतच इतके सजीव आणि तपशीलवार 3D मॉडेलमध्ये रूपांतर करण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता खरोखरच उल्लेखनीय आहे. ही सेवा मोफत असल्याने सामान्य लोकांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वांमध्ये ती लोकप्रिय होत आहे. यामुळे राजकीय नेते केवळ पारंपरिक माध्यमांतूनच नव्हे, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आपली प्रतिमा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या फोटोने तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव अधोरेखित केलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.