Nana Patole allegations on BJP Dainik Gomantak
गोवा

भाजपचं गर्वहरण जनताच करणार : नाना पटोले

गोव्यात भाजपला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं नसल्याचाही पटोलेंचा टोला

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपला पाचपैकी फक्त तीन राज्यात पूर्ण बहुमत मिळालं आहे. मात्र गोव्यात भाजपला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. त्यामुळेच त्यांना अपक्ष आणि मगोचा पाठिंबा घ्यावा लागतोय. मात्र आगामी निवडणुकीत भाजपचा अहंकार जनताच संपवून टाकेल असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे. गोव्यात हार पत्करली असली तरीही गोमंतकीय जनतेने पूर्णपणे भाजपला स्वीकारलं नसल्याचं पटोले म्हणाले आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) सुपडासाफ झाला असला तरीही येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्त्व आणखी ताकदीने लढणार आहे. काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्त्व अजूनही भक्कम आहे आणि याचा फायदा आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होणार असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. तसंच महाराष्ट्रातही जनता मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचं (BJP) गर्वहरण करणार असल्याचा दावाही पटोलेंनी केला.

दरम्यान गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election) काँग्रेसला 40 पैकी केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. गोव्याच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार करतो, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केलं आहे. आम्ही गोव्यात पराभव स्वीकारला आहे. मात्र आम्ही जनतेसाठी काम करत राहू असंही चिदंबरम पुढे म्हणाले आहेत. तर काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपलं पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक करावी, असंही चोडणकर पुढे म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT