मग जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते.हेच पुन्हा एकदा नम्रता साळगावकर (Namrata Salgaonkar) हिच्या यशावरून (success) समोर येतंय. Dainik Gomantak
गोवा

Goa: नम्रताने परिस्थितीवर मात करत मिळविले घवघवित यश

पार्से येथील पार्से हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी नम्रता अशोक साळगावकर हिने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आदर्श घालून दिला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल नवचेतना युवक संघ पेडणे व फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान गोवा यांच्यातर्फे तिचे अभिनंदन करून गौरव करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

मोरजी: परिस्थिती कितीही बिकट असली, तरीही काही माणसं जिद्द सोडत नाही. नियती अग्निपरीक्षा घेत असते, मात्र त्यातूनही काही जण अगदी ताऊन सुलाखून निघतात. संकटांना (crises) थेट भिडणारी आणि आभाळ कोसळले तरी त्यावर पाय रोऊन उभं राहणारी माणसं इतरांसाठी आदर्श ठरतात. परीक्षा ही बळ देते फक्त एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी असली पाहिजे. मग जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते.हेच पुन्हा एकदा नम्रता साळगावकर (Namrata Salgaonkar) हिच्या यशावरून (success) समोर येतंय. तिने अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेले यश हे खरच आदर्शवत आहे,असे उद्गार शिक्षिका माधवी गवंडी यांनी काढले.

पार्से येथील पार्से हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी नम्रता अशोक साळगावकर हिने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आदर्श घालून दिला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल नवचेतना युवक संघ पेडणे व फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान गोवा यांच्यातर्फे तिचं अभिनंदन करून गौरव करण्यात आला.तसेच तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही करण्यात आली व तिला पुढील शिक्षण घेत असताना इंग्रजी विषयात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी 'लॅंग्वेज नेस्ट' या उपक्रमाच्या अंतर्गत तिला संस्थेच्या वतीने मोफत इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

यावेळी शिक्षिका माधवी गवंडी, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी,नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, सचिव ओंकार गोवेकर, गौरेश पेडणेकर, पूजा नारोजी, ऋषिकेश सातार्डेकर, साहिल सावंत, लक्ष्मण तुळसकर, पार्सेकर आदी उपस्थित होते.

'लॅंग्वेज नेस्ट' तर्फे मोफत इंग्रजी प्रशिक्षण

नवचेतना युवक संघ पेडणे व गिरीश हळदणकर यांचे 'लॅंग्वेज नेस्ट' यांच्या सहयोगाने कुमारी नम्रता साळगावकर हिला पुढील शिक्षणासाठी इंग्रजी विषयात कुठल्याही अडचणी येऊ नये तसेच इंग्रजी बोलताना,वाचताना ती परिपक्व व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने तिला मोफत इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देणार असून तिला त्या अभ्यासक्रमासाठी लागणारी निवडक इंग्रजी विषयक पुस्तके देणार असल्याचे नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी सांगितले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलं यश

कुमारी नम्रता हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. तिने कुठेही अतिरिक्त शिकवणी घेतलेली नाही. केवळ पार्से हायस्कूलच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनातून तिने हे यश मिळवलं आहे.

नम्रताच्या यशाबद्दल सर्वत्र तिचं अभिनंदन

नम्रता ही आपल्या आई आणि आजीसोबत लहानशा घरात राहते. तिचे वडील हयात नाहीत. तिची आई काबाडकष्ट करून आपले घर चालवते. घरात गरीबी असतानाही मुलांना शिकवण्याची जिद्द तिच्या आईने बाळगली होती. सकारात्मक दृष्टीकोण असेल तर परिस्थितीवर मात करता येते, यावर तिचा विश्वास आहे. तिने वडिलांना यश अर्पण करताना आईच्या परिश्रमाला श्रेय दिले. या शैक्षणिक प्रवासात मुख्याध्यापक व इतर शिक्षकांची मोलाची मदत केल्याचे ती आवर्जून सांगते. यावेळी नम्रता साळगावकर हिने आभार व्यक्त करताना सांगितले की, तिच्यासाठी हा गौरव खूप महत्त्वाचा असून ती आयुष्यामध्ये खूप मेहनत घेऊन आई वडिलांचे नाव उज्वल करणार असल्याचे तिने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT