name Bhausaheb Mopa political parties dainik gomantak
गोवा

Goa News : ‘मोपा’ला भाऊसाहेबांचेच नाव द्या!

विविध राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्यांची उपस्‍थिती

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : पहिले मुख्‍यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याच्या अस्मितेचे प्रतीक, नैतिकतेचा मापदंड, कुळ-मुंडकारांचे कैवारी होते. त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले; पण सरकारी पगार, गाडी, बंगला कधी घेतला नाही. त्यांचे मंत्रिमंडळ हे स्‍वच्‍छ व भ्रष्‍टाचारमुक्‍त होते. त्यांनी पोर्तुगीज राजवटीमधील अन्‍याय दूर करून राष्ट्रीय भावना जागृत केली. अन्‍य कोणाचीही त्‍यांच्‍याशी तुलना होऊ शकणार नाही. म्‍हणूनच भाग्‍यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला मिळावे, अशी मागणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आज पेडणे येथे केली.

भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीतर्फे गुरुवारी पेडणे येथे भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला द्यावे, या मागणीसाठी धरणे आयोजित केले होते. माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, महेश राणे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रा. वेलिंगकर म्‍हणाले, भाऊ आणि त्‍यांचे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारमुक्त होते. काँग्रेस राजवटीत समुद्रात एकच कॅसिनो बोट होती. पर्रीकरांनी कायदा करून कॅसिनोच्या सहा बोटी मांडवीत आणल्या. जर मोपा विमानतळाला भाऊंचे नाव मिळाले नाही तर जनता या सरकारला योग्‍य तो धडा शिकवेल.

ॲड. रमाकांत खलप म्हणाले, मोपा विमानतळासाठी भाऊसाहेब बांदोडकर, ‘दाबोळी’ला जॅक सिक्‍वेरा यांचे नाव द्यावे. पर्रीकरांचे या अगोदर अनेक ठिकाणी नाव देण्यात आले आहे. जनतेची ही मागणी आम्‍ही केंद्राकडे पोहोचवूया. यावेळी काँग्रेसचे संजय बर्डे म्हणाले, मोपा विमानतळासाठी अल्‍पदरात जमिनी घेण्‍यात आल्‍या. त्‍याला आम्‍ही मनोहर पर्रीकर यांना जबाबदार धरतो. म्‍हणूनच आमचा त्‍यांच्‍या नावाला विरोध आहे.

उपजिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन

यावेळी जितेश कामत, रमेश नाईक, महेश राणे, डॅनियल डिसोझा, प्रा. गजानन मांद्रेकर, निमंत्रक सुभाष केरकर, विनायक महाले, उदय महाले, पेडणे बहुजन समाज अध्यक्ष उमेश तळवणेकर, उमेश गाड, महादेव गवंडी, अनील केरकर, अमृत आगरवाडेकर आदींनी मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव हवे, अशी भूमिका यावेळी मांडली. तसे निवेदन उपजिल्‍हाधिकारी दीपक वायंगणकर यांना सादर करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT