Nagarjuna At IFFI 2024 Canva
गोवा

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: आमच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण ठेवणे, त्यांच्याबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन अक्केनेनी यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Nagarjuna At IFFI 2024

पणजी: आम्हाला लहानपणी पौराणिक गोष्टी सांगितल्या जायच्या. स्वातंत्र्य सैनिकांबाबत सांगितले जायचे, परंतु ते कमी प्रमाणात सांगितले जायचे. आमच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण ठेवणे, त्यांच्याबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन अक्केनेनी यांनी सांगितले.

भारत है हम अंतर्गत ५२ ॲनिमेशन फिल्मच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माहिती आणि प्रसारण सचिव संजीव जाजू व इतर उपस्थित होते.

दरम्यान यंदा इफ्फीमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील चार दिग्गज राज कपूर, महमंद रफी, तपन सिन्हा आणि एएनआर म्हणजेच माझे वडील अक्किनेनी नागेश्वर राव मानवंदना देण्यात येत असल्याने त्यासाठीच मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांचे चित्रपट पाहून, गाणी ऐकून आम्ही मोठे झालो त्यांच्या सफरनामा या विशेष प्रदर्शनाचे माझ्या हस्ते उद्‍घाटन झाले, यासाठी मी अतिशय आनंदित असल्याचे त्यांनी सांगितले.

नागार्जुन नाचतात तेव्हा...

सफरनामाच्या उद्‍घाटनानंतर नागार्जुन यांनी या प्रदर्शनात फेरफटका मारत माहिती घेतली व नंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आस्वाद घेतला. अचानक कार्यक्रमात नृत्य करणारी एक महिला नागार्जुनांजवळ आली आणि त्यांना नृत्य करण्यासाठी आग्रह धरला, त्यावेळी त्यांनी केवळ एक झलक दाखविली आणि उपस्थित चाहत्यांमध्ये उत्साह संचारला.

कुटुंबीयांसह हजेरी

अभिनेत नागार्जुन आपल्या कुटुंबीयांसह इफ्फी फियेस्टा आणि सफरनाम्याच्या उद्‍घाटनावेळी उपस्थित होते. अभिनेता नागा चैतन्य, अभिनेत्री अमला अक्किनेनी, अखिल अक्किननी आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला देखील उपस्थित होती. आपल्या वडिलांच्या तसेच आजोबांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सफरनाम्यात त्यांनी फेरफटका मारला व आपल्या आठवणींना उजाळा दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT