Naga Chaitanya Sobhita at IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

Naga Chaitanya: नागा चैतन्य आणि शोबिताची इफ्फीत ग्रँड एन्ट्री; नवीन जोडीनं वेधलं अनेकांचं लक्ष

Naga Chaitanya Sobhita IFFI Goa: नागा चैतन्य हा दक्षिण चित्रपट सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे आणि अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या सामंथा रूथ प्रभू हीच पूर्व पती आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात बुधवारपासून आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. या सोहळयाला देश-विदेशातून सिनेकलाकार उपस्थिती लावत आहेत. आज गौहर खान आणि फौजी-2 च्या संपूर्ण टीमने चित्रपट महोत्सवाला उपस्थिती लावली. महत्वाचं म्हणजे आजकाल चर्चेत असणाऱ्या दक्षिणी चित्रपटांमधील नावाजलेला चेहरा, नागा चैतन्य याने देखील वडील नागार्जुन, होणारी बायको शोबिता आणि संपूर्ण परिवारासोबत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आयनॉक्स पणजी येथे रेड कार्पेटवर हजेरी लावली.

लवकरच नागा चैतन्य आणि शोबिता लग्नगाठ बांधणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत आणि अशात दोघांनी सोबत गोव्यात चित्रपट महोत्सवाला हजेरी लावल्याने चाहत्यांना आनंद झाला. नागा चैतन्य हा दक्षिण चित्रपट सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे आणि अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या सामंथा रूथ प्रभू हीच पूर्व पती आहे.

2017 मध्ये सामंथा आणि नागा चैतन्य यांनी हिंदू आणि ख्रिस्ती पद्धतीने लग्नगाठ बांधली होती आणि केवळ चार वर्षांनंतर दोघांचा संसार मोडला. यानंतर आता लवकरच नागा चैतन्य आणि शोबिता लग्न करणार आहेत. शोबिता तिच्या नाईट मॅनेजर मधल्या अभिनयासाठी ओळखली जाते.

राज्यात फिल्म फेस्टिव्हल तर साखळीत बलून टँट थिएटर

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची बरीच चर्चा सुरु आहे. बुधवारी पणजीतील शामाप्रसाद मुखर्जी मैदानावर आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि यानंतर आता गुरुवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अनुषंगाने साखळीत साकारण्यात आलेल्या बलून टँट थिएटरचे पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT