Goa Tourism | National Bank for Agriculture and Rural Development Canva
गोवा

Goa Tourism: ..आता 'कृषी' तथा 'ग्रामीण' पर्यटनावर लक्ष! गोवा नाबार्ड, प्रादेशिक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

NABARD: गोवा पर्यटन खात्याचे संचालक आणि पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ग्रामीण पर्यटन वाढविण्यासाठी कृती करण्यायोग्य धोरणांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने प्रमुख भागधारकांना एकत्र आणले.

गोमन्तक डिजिटल टीम

NABARD Promotes Agro Eco Tourism In Goas Rural Areas

पणजी: नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) गोवाच्या प्रादेशिक कार्यालयाने महत्त्वपूर्ण प्रादेशिक सल्लागार समितीची बैठक घेतली असून यात गोव्यातील कृषी पर्यावरण पर्यटन तथा ग्रामीण पर्यटनाच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

गोवा सरकारच्या पर्यटन खात्याचे संचालक आणि जटीडीसी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत राज्यातील ग्रामीण पर्यटन वाढविण्यासाठी कृती करण्यायोग्य धोरणांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणले.

बैठकीत अन्य मान्यवरांच्या उपस्थितांमध्ये जीएम/ओआयसी नाबार्ड गोवा आरओ संदीप धारकर, आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ. प्रवीण कुमार, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतील (जीसीसीआय) कृषी समितीचे अध्यक्ष ओरलँडो रॉड्रिग्स, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे (एसएलबीसी) प्रतिनिधी, गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद, पर्यटन खाते, सहकार विभाग गोवा सरकार, गोवा राज्य सहकारी बँक (गोवा एसटीसीबी) आणि वनराई स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

यावेळी संदीप धारकर यांनी गोव्यातील ग्रामीण भागातील पर्यटन वाढविण्यासाठी ग्राम विहार योजनेला चालना देण्याच्या दृष्टीने नाबार्डच्या पुढाकारावर प्रकाश टाकला. डॉ. प्रवीण कुमार यांनी आपल्या भाषणात नमूद केले, की आयसीएआर-सीसीएआरआयने कृषी-पर्यावरण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नमुना विकसित केला आहे.

पुनरुत्पादन पर्यटनाच्या महत्त्वावर भर

सुनील अंचिपाका यांनी आपल्या मुख्य भाषणात पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकारच्या पर्यटन खात्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांवर भर दिला. पर्यटन विकास केवळ स्थानिक पर्यावरण आणि संस्कृतीचे संरक्षण करत नाही तर त्यांची वाढ सुनिश्चित करते असे सांगून त्यांनी पुनरुत्पादन पर्यटनाच्या महत्त्वावर भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT