Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: नॅक समितीच्‍या गोवा दौऱ्याबद्दल गुप्‍तता! पथकाची जुलैमध्‍ये भेट; विद्यापीठ प्रशासनाचे मौन

Goa University NAAC Visit: गोवा विद्यापीठात राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) समितीचा ७ ते १० जुलै दरम्यान दौरा होणार असून त्याबाबत विद्यापीठ प्रशासन मौन बाळगून आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी पुढील महिन्याच्या ७, ८ जुलै रोजी किंवा ८, ९ जुलै रोजी नॅकची समिती येणार आहे. तसा पत्रव्यवहार गोवा विद्यापीठाशी नॅक समितीने करूनही याची माहिती सर्व घटकांपासून विद्यापीठाने दडवून ठेवली आहे, अशी समिती येणार याची माहिती शिक्षण वर्तुळातील अनेकांना नाही.

गोवा विद्यापीठात राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) समितीचा ७ ते १० जुलै दरम्यान दौरा होणार असून त्याबाबत विद्यापीठ प्रशासन मौन बाळगून आहे. या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न सरकारला, ना लोकप्रतिनिधींना, ना प्रसारमाध्यमांना, ना नागरिक समाजाला देण्यात आलेली आहे. या संपूर्ण मौनाच्या मागे भीती, असुरक्षितता वा दोष झाकण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

नॅक समितीच्या दौऱ्यात संस्थेच्या कार्यपद्धती, गुणवत्ता, शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापन, भौतिक सुविधा, संशोधन, विद्यार्थी सहभाग आदी पैलूंचे मूल्यांकन होणार आहे. समिती दोन दिवसांत सखोल आढावा घेणार आहे.

संस्थेचे प्रमुख, वित्त व नोंदणी अधिकारी, विभाग प्रमुख यांची सादरीकरणे, गुणवत्ता आश्वासन कक्ष आणि विविध शैक्षणिक विभागांशी संवाद, ५० टक्के विभागांच्या व्हर्च्युअल भेटी, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, कक्षांची पाहणी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना इतर सामाजिक उपक्रम व शारीरिक-सांस्कृतिक सुविधा, ग्रंथालय, पायाभूत सुविधा परीक्षण, विद्यार्थी व माजी विद्यार्थी संवाद.

दौऱ्याचे स्वरूप

व्यवस्थापन समितीशी संवाद व शासन पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचा आढावा, विद्यापीठाची दोन उत्कृष्ट

उपक्रम सादरीकरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी

संवाद, अंतिम अहवाल लेखन व गुण निश्चिती असे दौऱ्याचे स्वरूप असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT