Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council: मडगाव पालिकेतील चोरीबद्दल गूढ वाढले

दिवसाढवळ्या डल्ला : चोरी झालेल्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Municipal Council: भरदिवसा सगळे कर्मचारी कामावर असताना मडगाव नगरपालिकेच्या करवसुली विभागातील ड्रॉवरमधून 50 हजारांची रोकड गायब झाल्याने हा चर्चेचा विषय झालेला असताना ज्या ठिकाणी चोरी झाली नेमका त्याच ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे दिसून आले असून नेमका हाच कॅमेरा बंद कसा, या नव्या चर्चेने आता जोर धरला आहे.

ज्या दिवशी ही चोरी झाली त्या दिवसाचे सर्व फुटेज नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी तपासून पाहिले असता एक व्यक्ती धावत पालिकेतून बाहेर जात असल्याचे दिसून आले.

मात्र, त्यानेच हे पैसे काढले, हे त्यात दिसत नाही. नगराध्यक्ष शिरोडकर यांनी हे फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यासंबंधीची तक्रार मडगाव नगरपालिकेने सोमवारी पोलिसांत दाखल केली आहे.

ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे सोपो कलेक्शनचे होते. सर्व सीसीटीव्ही तपासले; परंतु विशिष्ट सीसीटीव्ही काम करत नाही आणि त्यामुळे तपासात अडथळे निर्माण होत आहेत.

तरीही एक संशयित इतर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या दृष्टीने तपासाची दिशा वळविण्यात आली आहे.

चोरीला गेलेली करवसुली एका मार्केट इन्स्पेक्टरच्या ड्रॉवरमधून काढून नेण्यात आली आहे आणि ही 50 हजार रुपयांची करवसुली तीन दिवसांची होती.

- अभय राणे, वरिष्ठ लेखाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT