Mysterious Death Of Two Brothers In Margoa Goa Due To Starvation Dainik Gomantak
गोवा

Margao Goa News: दोन दिवस वडील दार ठोठावत होते; गोव्यात बंद खोलीत आढळले सख्ख्या भावांचे मृतदेह, उपासमारीमुळे बळी?

Margao, Goa Crime News: चौकशीवेळी त्यांची आई मनोरुग्ण असल्याचे आढळून आले. त्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आके येथील एका फ्लॅटमध्ये दोघे सख्खे भाऊ गूढरित्या मृतावस्थेत आढळले, तर त्यांची आई फ्लॅटमधील त्याच खोलीत अत्यवस्थ अवस्थेत दिसून आली. चौकशीवेळी त्यांची आई मनोरुग्ण असल्याचे आढळून आल्याने या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. बुधवारी (दि.24) ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.

महम्मद झुबेर खान (29) आणि अफान खान (27) अशी मृतांची नावे आहेत, तर रुक्साना खान (54) असे त्यांच्या आईचे नाव आहे.

या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या दोघा भावांच्या मृत्यूस कोण कारणीभूत आहे, याचा पोलिस सध्या शोध घेत आहेत. आके येथील पॅराडाईस इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली.

खान कुटुंबीयांमध्ये घरगुती कारणामुळे वादविवाद होता. रुक्सानाचे पती त्यांच्याबरोबर राहात नव्हते. हे कुटुंबीय इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांच्याही संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयी इमारतीमधील रहिवाशांनाही अधिक माहिती नाही. अनेकवेळा या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज ऐकू यायचा, असे येथील स्थानिकांनी सांगितले.

रुक्साना यांची दोन्हीही मुले सुशिक्षित होती. मात्र, त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. आम्ही सर्व दृष्टीकोनातून तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर तपास करीत आहेत.

मृत भावांचे वडील गेले दोन दिवस या फ्लॅटकडे येत होते. मात्र, आतून कुणीच प्रतिसाद देत नव्हते. बुधवारी सायंकाळी ते फ्लॅटवर आले होते. त्यांनी दरवाजा ठोठावूनही बघितला. मात्र, कुणीच प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनी मडगाव पोलिस ठाण्यात कळविले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनाही बोलावून घेतले. जवानांनी दरवाजा उघडल्यानंतर आत हृदयद्रावक दृश्य दिसून आले.

उपासमारीमुळे बळी?

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये अन्नपाण्याचा एक कणही नव्हता. मडगाव पोलिस विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवले आहेत. त्यांच्या आईला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT