भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कळंगुटात त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना मंत्री मायकल लोबो, सोबत एकनाथ नागवेंकर  संतोष गोवेकर
गोवा

भुमीपुत्र विधेयकास माझा विरोध, मंत्री मायकल लोबो यांचा भाजपला घरचा आहेर 

गोवा भुमीपुत्र अधिकारीणी विधेयक विधानसभेत घाईगडबडीत सादर करून सरकारने गोवा स्वातंत्र्य संग्रामात गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: गोव्याची भुमी ही स्थानिक निज गोंयकारांची आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थानिक लोकांचे हीत डोळ्यांसमोर ठेवून  मुंडकार कायदा अस्तित्वात आणला होता. मात्र, नुकतेच सरकारकडून  विधानसभेत सादर करण्यात आलेल्या भुमीपुत्र विधेयकाची दुरुस्ती (Amendment of Bhumiputra Bill) करून ते विधेयक विधानसभेत पुन्हां सादर करेपर्यत आपला या विधेयकास  वैयक्तिक विरोध राहाणार (There will be personal opposition to the bill) असल्याचे सनसनाटी वक्तव्य कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो (Rural Development Minister Michael Lobo) यांनी कळंगुटात केले. गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्याने आयोजित कार्यक्रमात मंत्री लोबो बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, स्वातंत्र्य सैनिक सिरीयाको डायस, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर, कळंगुट भाजपा गट अध्यक्षा श्रीमती जोजफीना डायस, बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत (चानु)चोडणकर , एकनाथ नार्वेकर, सुरज नाईक, सम्राट कल्ब कळंगुटच्या प्रतिभा नार्वेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, स्थानिक बेघर गोमंतकीयांना स्वताचे घर आणी गोरगरीब जनतेला शिक्षणाची दारे उघडी करून भाऊसाहेबांनी भुमीपुत्रांसाठी अलौकीक असे कार्य केल्याचे मंत्री लोबो यांनी पुढे सांगितले.

स्वातंत्र्य सैनिक सिरीयाको डायस

गोवा भुमीपुत्र अधिकारीणी विधेयक विधानसभेत घाईगडबडीत सादर करून सरकारने गोवा स्वातंत्र्य संग्रामात गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. गोमंतकीय जनता शांत तशीच समंजस आहे परंतु सरकारला यागोष्टीवरुन त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहाणार नाही.

मगोचे निष्ठावंत एकनाथ नागवेंकर

आग्वाद किल्ल्याचे संग्रहालयात रुपांतर व्हावे अशी स्थानिक जनतेची मागणी होती परंतु तेथील संग्रहालय खाजगी संस्थेच्या ताब्यात दिल्यास त्याचे रुपांतर कसिनोत होणार नाही या गोष्टीकडे सरकारने लक्ष द्यावे. त्यांचप्रमाणे भाऊसाहेबांच्या काळातील फुटबॉल पटु आलेक्स कुतिन्हो, पीटर गोमीस तसेच यांचे स्मारक बागा जंक्शनवर उभारण्यात यावे. कळंगुटात जोरदार पाऊस पडत असतांनाही भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला स्थानिकांची आवर्जून उपस्थिती लाभली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT