Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: गळ्यावर वार, नेपाळी सुरक्षा रक्षकाचा म्हापसा येथे सापडला मृतदेह, खूनाचा संशय

पोलिसांना घटनास्थळी एक बॅग सापडली असून, त्यामध्ये काही वैद्यकीय कागदपत्र देखील सापडली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा येथे एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून, त्याच्या गळ्यावर वार केल्याचा दिसून आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपासासाठी त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, या घटनेमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोडगिणी, म्हापसा येथील मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाच्या गळ्यावर बाटलीच्या काचेने वार केल्याचे प्रथमदर्शिनी दिसून आले आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नबीन (वय 33) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांना घटनास्थळी एक बॅग सापडली असून, त्यामध्ये काही वैद्यकीय कागदपत्र देखील सापडली आहेत.

दरम्यान, या संशयास्पद घटनेमागचे नेमके कारण काय याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT