Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: अनैतिक संबंधांच्या रागातून पत्नीचा खून

दाम्पत्य वास्कोचे; निर्दयीपणे चेहराही ठेचला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Murder Case  पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने साथीदाराच्या मदतीने मोटारीत पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला.

त्यानंतर ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून तिचा चेहरा विद्रूप करीत मृतदेह घोटगेवाडी पुलाखाली टाकला. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह दोघांना अटक केली.

दोडामार्ग पोलिसांनी सांगितले, की पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहात असल्याच्या व याबाबत वारंवार समजावूनही ती ऐकत नसल्याच्या रागातून संशयिताने कृत्य केले. विशिता विनोद नाईक (वय ३०, रा. वास्को) असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पती विनोद मनोहर नाईक (४०, मूळ रा. बेलबाय, वास्को व सध्या रा. पिंटो अपार्टमेंट, म्हापसा) व त्याचा साथीदार ऋतुराज श्रावण इंगवले (२५, मूळ रा. चंदगड, जि. कोल्हापूर व सध्या रा. च्यारीवाडी-म्हापसा) यांना अटक केली.

ओढणीचा फास

विशिता ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने दोघांत गाडीमध्येच जोरदार भांडण झाले. यातच त्याने ओढणीने गळा आवळत तिचा खून केला.

यानंतर ऋतुराजच्या मदतीने भटवाडी येथील पुलाच्या खाली डाव्या बाजूला आणून मृतदेह फेकण्याचा प्रयत्न केला. विशिताची शरीरयष्टी सुदृढ असल्याने त्यांनी मृतदेह ओढत नेऊन पुलाच्या उजव्या बाजूला नेऊन टाकला.

समजूत काढण्याचा प्रयत्न अयशस्वी

विनोदने दिलेल्या जबाबानुसार विनोद व विशिता यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. मात्र, विशिताच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली. ती 2020 पासून त्याच्यासोबत राहायची. असे असतानाही ती अधूनमधून पती विनोदला एका हॉटेलमध्ये भेटायची.

तीन वर्षे असेच सुरू होते. विनोद विशिताची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा; मात्र तिने दुर्लक्ष केले. सोमवारी त्यांच्यात पुन्हा भेटण्याचे ठरले आणि ठरल्याप्रमाणे ते एका हॉटेलमध्ये भेटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT