पत्रकारांनी तसा पुरावा आहे का?असे चौधरी यांना विचारताच पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांनी तसा पुरावा आहे का?असे चौधरी यांना विचारताच पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले.  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder case: पुरावे नसताना चौधरी यांनी केला तरुणीच्या अपहरण झाल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुट समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेल्या 19 वर्षीय तरुणी हिचे अपहरण (Kidnapping) झाल्याचा दावा आज कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी (Naushad Chaudhary, president of NSUI, the student wing of the Congress) यांनी केला. मात्र पत्रकारांनी तसा पुरावा आहे का?असे चौधरी यांना विचारताच पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरावा नसताना एका गंभीर प्रकरणी खोटा दावा करण्याच्या या प्रकारामुळे या संवेदनशील प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. चौधरी यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की या तरुणीचे म्हापसा बसस्थानकावरुन अपहरण झाले होते व त्यानंतर तिचा मृतदेह कळंगुट किनाऱ्यावर मिळाला होता. सरकारने या प्रकणी कसून चौकशी करतानाच राज्यातील सर्व बसस्टॉप, सार्वजनीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणीही यावेळी चौधरी यांनी केली. मात्र अपहरण केल्याचा पुरावा आहेका ? तो तुम्ही पोलिसांना देणार का? असे प्रश्‍न पत्रकारांनी विचारले असता आपल्याकडे पुरावा नसल्याचेही चौधरी यांनी यावेळी मान्य केले.

दरम्यान १ सप्टेंबरनंतर जी महाविद्यालये आपले वर्ग सुरु करु इच्छितात त्यांना वर्ग सुरु करण्यास उच्च शिक्षण संचालनालयाने परवानगी देणारे जे परिपत्रक काढले आहे त्याला चौधरी यांनी आक्षेप घेऊन जो पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १०० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरु करण्यास एनएसयुआयचा विरोध असल्याचे सांगितले. महाविद्यालयात लसीकरण शिबीर आयोजित करुन लसीकरण करण्याची मागणी यावेळी चौधरी यांनी केली.

बहुतांश विद्यार्थ्यांनी घेतलाय पहिला डोस

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण सुरु आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हे १८ वर्षावरील आहेत. त्यांमुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. ज्यांना पहिला डोस घेऊन ९० दिवस झालेत ते दुसरा डोस घेत आहेत. सरकारने सरसकट महाविद्यालये सुरु करण्याचे आदेश दिलेले नाहीत. काही महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांनी स्वताहून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी मागितल्याने उच्च शिक्षण संचालनालयाने ज्यांना महाविद्यालयाचे वर्ग सुरु करायेच आहेत त्यांनी कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम पाळून वर्ग सुरु करता येतील असे परिपत्रक काढले आहे. राज्यात सध्या सर्वच व्यावहार सुरु आहेत. गेली दिड वर्षे घरात कोंडून पडलेल्या विद्यार्थ्यांनाही वर्ग सुरु व्हावेत असे वाटत आहेत. त्यामुळे सरकार टप्प्या टप्प्याने महाविद्यालये सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT