Fatorda Sujay Lotlikar Fight  Dainik Gomantak
गोवा

Fatorda News: नगरसेविकेच्या पतीची भर रस्त्यात नागरीकाला बेदम मारहाण; फातोर्ड्यातील घटना

पोलिसांनी घेतले ताब्यात, व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल

Akshay Nirmale

Fatorda News: फातोर्ड्यातील एका नगरसेविकेच्या पतीने एका सामान्य नागरीकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

फातोर्ड्यातील नगरसेविका श्वेता लोटलीकर यांचे पती सुजय लोटलीकर यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या व्हिडिओमध्ये सुजय लोटलीकर एका नागरीकाला भर रस्त्यात बेदम मारहाण करताना दिसतात. त्यांच्यासोबत आणखी एक इसमदेखील संबंधित व्यक्तीला मारहाण करताना दिसतो.

ज्या नागरीकाला मारहाण झाली होती त्याने लोटलीकर यांना नगरपालिकेचे कर्मचारी खासगी जागेतील कामासाठी कशासाठी वापरता, असा सवाल केला होता. त्यावरून ही मारहाण झाल्याचे समजते.

या प्रकरणी पोलिसांनी सुजय लोटलीकर याला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT