Municipal council meeting sub-inspector victim, People's Union keep protesting
 Municipal council meeting sub-inspector victim, People's Union keep protesting 
गोवा

नगरसेवक कारवाई प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाची बदली, पीपल्स युनियनकडून निषेध

दैनिक गोमंतक

म्हापसा: नियमभंग केल्याप्रकरणी म्हापसा (Mapusa) पोलिसांनी नगरसेवक स्वप्नील शिरोडकर व त्यांचे बंधू या दोघांवर कारवाई केली असता ते प्रकरण हाताळणारे पोलीस उपनिरीक्षक (Police) अनिल पोळेकर यांची तडकाफडकी बदली केल्याने आश्चर्यव्यक्त करण्यात येत आहे. आम्ही याबाबत राज्य सरकारचा निषेध करतो, असे म्हापसा पीपल्स युनियननेचे (People's Union) अध्यक्ष अकबर शेख यांनी स्पष्ट केले. 

शेख म्हणाले, पोलिसांनी शिरोडकर बंधूंवर कारवाई केली असता, त्यांनी पोलिसांनाच पोलिसी खाक्या दाखविला. पोलिसांनी  त्या दोघांना वाहनात बसवले असता ते पोलिसांनाच ढकलून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर बळाचा वापर करत चोप दिला होता. पोलिस स्वत:चे काम चोख बजावत असतानासुद्धा राजकारण्यांनी हस्तक्षेप करून गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीस पाठीशी घालून पोलिस अधिकाऱ्याची  तडकाफडकी बदली करणे हे निषेधार्हच आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी अनिल पोळेकर यांची बदली केल्याने आम्ही राज्य सरकारचा निषेध करत आहोत.

संघटनेने यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,  शिरोडकर यांनी आधीच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात जुन्या नगरपालिका इमारतीत म्हापसा पीपल्स युनियनचे जवाहरलाल शेट्ये व सुदेश तिवरेकर यांच्याशी नगराध्यक्षांसमोरच बातचीत चालू असताना भांडण उरकून काढून सुदेश तिवरेकर यांच्यावर हातघाई केली होती. त्यानंतर  शिरोडकर यांचा ओबीसी दाखला बोगस असल्याचे समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर पुराव्यानिशी सिद्ध केल्यानंतर तो दाखला उत्तर गोवा उप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रद्द करण्यात जवाहरलाल शेट्ये यांनी बऱ्यापैकी मेहनत घेतली होती. त्यानंतर त्यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले व एकंदरीत सुनावण्या झाल्यानंतर हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी कोरोनाविषयक परिस्थिती उद्भवल्याने  रेंगाळले होते. मागच्या वर्षी जवाहरलाल शेट्ये रात्री श्वानास घेऊन घराबाहेर फेरफटका मारण्यास गेले असता शिरोडकर यांनी त्यांना मोटरसायकल अंगावर घालून मारहाण केली होती व ते प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेले असता शिरोडकर यांना दहा हजार रुपयांचा बाँड भरावा लागला होता.यासंदर्भात बोलताना संघटनेचे पदाधिकारी सुदेश तिवरेकर म्हणाले, मतदारांना त्यांच्या राहत असलेल्या बेकायदा घरांच्या  अस्तित्वाची धमकीवजा जाणीव करून देऊन तसेच त्यांना त्यांची घरे कायदेशीर करून दिली जातील अशी फसवी आश्वासने शिरोडकर बेकायदा घरांची संख्या जास्त असलेल्या प्रभागातून अवघ्याच मतांची आघाडी घेऊन निवडून आले. सत्ताधारी भाजप पक्षाचा जाहीर पाठिंबा असलेल्या म्हापसा विकास आघाडी पुरस्कृत पॅनलची उमेदवारी मिळवून ते यंदाच्या निवडणुकीत काठावर पास होत निवडून आले आहेत. स्वप्नील शिरोडकर यांनी राज्यात १४४ कलम व संचारबंदी असतानासुद्धा रात्री दहाच्या दरम्यान स्वत:च्या वाहनातून येऊन शेजाऱ्यांशी विनाकारण हुज्जत घातली व त्यांच्याशी भांडण उरकून काढले. त्यात दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. त्या दरम्यान पोलिस ताफा तेथे पोहचला होता. शिरोडकर यांचा भांडखोरपणा, गुंड प्रवृत्ती, इतर मागासवर्ग दाखल्याचे बोगस प्रकरण, खोटारडेपणा तसेच समाजघातक वृत्ती हे सारे बऱ्यापैकी माहीत असूनही त्यास म्हापशातील दिवंगत माजी आमदार फ्रांसिस डिसोझा यांनी सतत पाठिंबा दिला होता. तसेच सध्याचे आमदार व म्हापसा भाजप मंडळही त्यांना सतत प्रोत्साहन देत आलेले आहे. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला उघड पाठिंबा देण्यावरून भाजपचे खरे रूप दिसून येते. असे तिवरेकर यांनी सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT