Mungul Gang War Dainik Gomantak
गोवा

Mungul Gang War: संशयितांना पकडले, नातेवाईकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक; मुंगूल गँगवॉर प्रकरणाने घेतले हिंसक वळण

Mungul Crime news: पोलिसांनी फरार होऊन कर्नाटकात आसरा घेतलेल्या काही संशयितांना जेरबंद करून पोलिस ठाण्यात आणल्यानंतर एका संशयिताच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यावर धिंगाणा घालताना ठाण्यावर दगडफेक केली.

Sameer Panditrao

मडगाव: मुंगूल येथील गँगवॉर प्रकरणाने आता हिंसक वळण घेतले आहे. काल शुक्रवारी रात्री फातोर्डा पोलिसांनी फरार होऊन कर्नाटकात आसरा घेतलेल्या काही संशयितांना जेरबंद करून पोलिस ठाण्यात आणल्यानंतर एका संशयिताच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यावर धिंगाणा घालताना ठाण्यावर दगडफेक केली. आता तेसुद्धा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

या हल्ल्यात राजकीय वरदहस्त लाभलेल्‍या व सध्या सरकारी नोकरी करणाऱ्या एकाने या फरार संशयितांना कर्नाटकात जाण्यासाठी मदत केली होती, त्यांची सर्व बडदास्त ठेवली होती. त्याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. दीपक कट्टीमनी (४७) असे त्याचे नाव आहे.

काल शुक्रवारी रात्री कारवार जिल्ह्यातील चित्ताकुल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कुख्यात गुन्हेगार इम्रान बेपारी, अविनाश गुंजीकर, अक्षय तलवार, असिफ व सलमान सय्यद यांच्या मुसक्या आवळल्या.

यातील सलमान याचा या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्याने या सर्व संशयितांना राहण्यास मदत केली होती. त्‍यासाठी त्याला दीपकने टीप्स दिल्या होत्या असे प्राथमिक पोलिस तपासात उघड झाले आहे.

अन्य एका कारवाईत पोलिसांनी या हल्लाप्रकरणी जोयस्टोन फर्नांडिस (२०) याला पर्वरी येथे जेरबंद केले. तसेच परशुराम राठोड यालाही अटक केली आहे. संशयितांनी हल्ल्यासाठी वापरलेली डस्टर कार, तलवार व अन्य हत्यारे जप्त केली आहेत. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी संशयितांचे मोबाईल कोल्स रेकॉर्डिंगवर ठेवले होते. दीपक हा संशयितांच्या सतत संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला पोलिसांनी उचलेले.

गॅंग दुश्‍‍मनी हेच हल्‍ल्‍यामागील प्रमुख कारण

या हल्ल्यामागील प्रमुख कारण हे गॅंग दुश्‍‍मनी असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असल्याचे दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले. संशयितांपैकी काहीजणांना गोव्यात तर काहींना कर्नाटकात अटक करण्यात आली. त्‍यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य काही संशयितांच्या मागावर पोलिस आहेत. तसेच संशयितांना मदत करणाऱ्या आणखी काहींना अटक होऊ शकते, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

आतापर्यंत १६ जणांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

मुंगूल येथील गँगवॉर प्रकरणात प्रत्यक्ष सहभागही असलेल्या १६ जणांना आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान बेपारी, आकाश तलवार, अविनाश गुंजीकर, जोयस्टोन फर्नांडिस, परशुराम राठोड, अमर कुलाल, ताहीर, राहुल शेख, विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख, मोहम्मद अली, सूरज, गौरांग, वासू, मलिक व सुनील बिल्वर अशी त्यांची नावे आहेत. तसेच एकूण सहा वाहने जप्त केली आहे. थार कार, बलेनो, फ्रँक्स, डस्टर, सुझुकी एक्सएल-६ या वाहनांचा त्‍यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT