Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Colvale Goa Accident News: गोव्याच्या सहलीसाठी आलेल्या एका कुटुंबाचा आनंदाचा प्रवास क्षणार्धात दु:खात बदलला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: गोव्याच्या सहलीसाठी आलेल्या एका कुटुंबाचा आनंदाचा प्रवास क्षणार्धात दु:खात बदलला. इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी ‘गुगल मॅप’चा आधार घेतलेल्या मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची स्कूटर कोलवाळ येथे चुकीच्या मार्गावर गेली, त्याचवेळी मद्यधुंद अवस्थेत आणि वैध वाहन परवान्याविना भरधाव स्कॉर्पिओ चालवणाऱ्या चालकाने स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आकांक्षा भन्साळी (वय ३६ वर्षे, रा. भाईंदर, ठाणे) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती कल्पेश जैन आणि मुलगी जखमी झाले. या घटनेमुळे गोव्यातील यंदाच्या रस्ते अपघातांतील मृतांचा आकडा २०३ वर पोहोचला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साळी-जैन कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात (Goa) आले होते. शनिवारी (ता. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते करासवाडा - म्हापसा येथून पेडण्याच्या दिशेने फॅसिनो स्कूटरवरून जात होते. राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलवाळ येथील घोटणेश्वर मंदिराजवळ हा अपघात घडला. महाराष्ट्र नोंदणीकृत स्कॉर्पिओचा चालक डेव्हिड गॅब्रिएल मोहिते (वय ३६ वर्षे, रा. मिरज, महाराष्ट्र) याने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिली. पोलिसांच्या तपासात मोहिते हा मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवत होता तसेच त्याच्याकडे वैध वाहन परवानाही नसल्याचे समोर आले आहे. धडकेनंतर स्कूटरवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

दुचाकीवर मागे बसलेल्या आकांक्षा भन्साळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. पती कल्पेश जैन आणि त्यांची मुलगी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोलवाळ पोलिसांनी कारचालक मोहितेविरुद्ध गुन्हा नोंदविला असून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अंतर्गत त्याला नोटीस बजावली आहे. ५ ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

१९३ जीवघेणे अपघात

गोव्यात यंदा आतापर्यंत १९३ जीवघेणे रस्ते अपघात नोंदविले गेले असून त्यात २०३ जणांचा बळी गेला आहे. आकांक्षा भन्साळी या यंदाच्या वर्षातील २०३ व्या बळी ठरल्या आहेत. वाढत्या अपघातांमुळे महामार्गांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

न्हयबाग येथे स्वयंअपघातात दुचाकीस्वार गंभीर

न्हयबाग येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील उतरणीवर आज दुपारी झालेल्या स्वयंअपघातात शर्मा नामक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तुये सरकारी इस्पितळात त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. याप्रकरणी पेडणे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर तपास करत आहेत.

पर्रात वेगवान कारचालकाने दोघांना उडविले

ब्रिटोवाडो - पर्रा येथे बेदरकारपणे कार चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी, सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास ब्रिटोवाडो येथील एका दुकानासमोरील रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागवा येथून म्हापशाच्या दिशेने जाणारी कार (गोवा नोंदणीकृत) चालकाने अतिवेगात आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या अत्यंत उजव्या बाजूला नेली व समोरून म्हापशाहून नागवेकडे जाणाऱ्या होंडा ॲक्टिव्हा दुचाकीला (गोवा नोंदणीकृत) थेट समोरून धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार महंमद कलीम मणिहार (४२, रा. कोलवाळ) आणि मागे बसलेले अयुब इद्रिशी (३९, रा. ब्रिटोवाडो, पर्रा) हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित कारचालक जखमींना वैद्यकीय मदत न पुरवता अथवा पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

SCROLL FOR NEXT