देवगड: बहुचर्चित मुंबई ते विजयदुर्ग सागरी रो - रो सेवेची प्रायोगिक तत्त्वावरील प्राथमिक चाचणी घेण्यात आली. मंगळवारी सायंकाळी बंदरात ही नौका दाखल झाली होती. विजयदुर्ग बंदरात यासाठी तयार केलेल्या बंदर जेटीला नौका लावून चाचणी झाली.
नौकेमध्ये वाहने चढवून प्रात्यक्षिकही झाले. दरम्यान, चाचणीनंतर ही नौका मुंबईच्या दिशेने रवाना झाली. वाहने घेऊन मुंबईतून सिंधुदुर्गात येणारी मंडळी आणि पर्यटकांसाठी सागरी रो -रो सेवा हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबईमधून विजयदुर्ग बंदरात उतरल्यावर वाहने घेऊन आपापल्या इच्छितस्थळी नागरिक, पर्यटक जाऊ शकतात. यामुळे कमी वेळेत सुरक्षित प्रवास घडू शकतो. या अनुषंगाने सागरी मार्गाने वाहने घेऊन येणाऱ्या रो -रो सेवेच्या नौकेचे मंगळवारी सायंकाळी विजयदुर्ग बंदरात आगमन झाले होते.
मुंबई ते विजयदुर्ग रो -रो बोटीच्या विजयदुर्ग बंदरातील उतारासाठी आवश्यक असणारा फ्लोटिंग पॅंटून विजयदुर्ग बंदरात जोडण्यात आला आहे. जोडणीनंतर त्याची चाचणी आज घेण्यात आली. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या पुढाकारातून ही सेवा उपलब्ध करून देण्यावर भर होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.