Mumbai-Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Flight: आता जीवाचा गोवा 'इंडिगो' संग! विमान तिकीट ट्रेनपेक्षाही झालं स्वस्त

Mumbai To Goa Cheap Flights: जर तुम्ही मुंबईहून गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही 27-28 एप्रिल दरम्यान अतिशय कमी भाड्यात विमानाने मुंबईहून गोव्याला जावू शकता.

Manish Jadhav

जर तुम्ही मुंबईहून गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही 27-28 एप्रिल दरम्यान अतिशय कमी भाड्यात विमानाने मुंबईहून गोव्याला जावू शकता. होय, चकीत झालात ना... ट्रेन प्रवासात पैशांबरोबर वेळही जातो. मात्र ट्रेनच्या तुलनेत विमानाने तुम्ही केवळ दीड तासांत मुंबईहून गोव्याला जाऊ शकता. एवढचं नाहीतर या कालावधीत ट्रेनच्या फर्स्ट एसी क्लासच्या भाड्याच्या तुलनेत विमानाचे भाडे कमी असणार आहे.

गोआयबिबोच्या वेबसाइटनुसार, 27-28 एप्रिल रोजी मुंबई-गोवा इंडिगो फ्लाइटचे भाडे ट्रेनच्या फर्स्ट एसी क्लासपेक्षा कमी असणार आहे. 27 एप्रिल रोजी मुंबईहून गोव्याला इंडिगोची पहिली फ्लाइट रात्री 9.10 वाजता आहे. तर दुसरी फ्लाइट रात्री 10.15 वाजता असणार आहे. दोन्ही फ्लाइटसाठी भाडे फक्त 2625 रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी इंडिगोची मुंबईहून (Mumbai) गोव्याला फ्लाइट रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास असून ती रात्री 11.30 वाजता दाबोळी विमानतळावर पोहोचेल.

त्याचवेळी, 26 एप्रिल रोजी सकाळी 9.10 वाजता मुंबईहून गोव्याला जाणारी इंडिगो फ्लाइट असून रात्री 10.25 वाजता दाबोळी विमानतळावर पोहोचेल. दुसरीकडे, एर्नाकुलम दुरांतो एसी ट्रेनचे मुंबई-गोवा (Goa) फर्स्ट एसीचे भाडे 3275 रुपये, मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीचे भाडे 3130 रुपये एवढे आहे. तर निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्सप्रेसचे फर्स्ट एसीचे भाडे 3120 रुपये एवढे आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही मुंबईहून गोव्याला फ्लाइटने 500 रुपयांसह 8 तासांचा वेळही वाचवू शकता. मुंबईहून गोव्याला ट्रेनला 9 तास लागतात. मात्र विमानाने तुम्ही फक्त दीड तासात पोहोचाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT