Abijit Ganguly Tweet on Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोवा पर्यटन वादात कॉमेडियन अभिजीत गांगुलीची उडी; म्हणाला, 'हा कसला फुफा attitude'

Abijit Ganguly Post on Goa: सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध कॉमेडियन अभिजीत गांगुलीने एक्सवर स्वतःचे मत मांडले आहे

Akshata Chhatre

Comedian Abijit Ganguly Post on Goa Tourism

पणजी : भारतातील अनेक प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे गोवा. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर केल्या जातायत. रामानुजन मुखर्जी नावाच्या एका व्यक्तीने गोव्यातील पर्यटनात घट झाल्याचा दावा करत एक्सवर एक पोस्ट लिहली होती आणि याच पोस्टला अनुसरून सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध कॉमेडियन अभिजीत गांगुली याने देखील स्वतःचे मत मांडले आहे.

या पोस्टमध्ये गांगुली म्हणतो की व्हिएतनाममधून परातल्यांनंतर गोव्याबद्दलचा एकूण वाद त्याला समजला. तो स्वतः देखील गोव्याला जायच्या विचारात होता मात्र गोव्याला जाऊन हॉटेल, फिरणं आणि खाण्यापिण्यावर खर्च करण्यापेक्षा आता त्याला आशियातील साऊथ-ईस्ट भागात जाणं जास्ती परवडणारं वाटतंय. गोव्यातील पर्यटनाच्या किमती जर का खिशाला परवडणऱ्या असत्या तर कदाचित पर्यटकांनी टॅक्सी माफियांकडे एवढं लक्ष देखील दिलं नसतं असं तो म्हणतोय.

गोव्याचा पक्ष घेऊन बोलणारे गोवा हे काही दारू पिण्याचं ठिकाण नाही असा दावा करतात, मात्र गांगुली याच्यामते एखादा माणूस घराबाहेर फिरण्यासाठी म्हणून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला मजा करायची असते, रिलॅक्स व्हायचं असतं.

अशावेळी आजूबाजूला कोण आहे किंवा आपण चार लोकांमध्ये वावरत आहोत का याकडे लक्ष देत नाही, मद्यपानानंतर जो उपद्रव केला जातो त्यावर आळा घालणं बरोबर आहे मात्र केवळ दारू पिण्याला नावं ठेवण्यात अर्थ नाही.

भारताजवळ भलीमोठी समुद्रपट्टी आहे मात्र गोवा सोडून पर्याय शोधायचं म्हटलं 'तर' ला काही उत्तर सापडत नाही. केरळ अजूनतरी गोव्यासोबत स्पर्धा करू शकत नाही.

त्यामुळे इतर राज्यांना आता लवकरच पर्यटनाच्या शर्यतीत उतरत गोव्यासारखी भूमिका बजावता आली पाहिजे. वाजवी किंमती, सुरक्षितता, व्यवस्थित स्वच्छता आणि दारू पिण्याबद्दल ओपन मेन्टॅलिटी असेल तर देश-विदेशातील कुठलाही पर्यटक हसतहसत येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Professional League: चुरशीच्या लढतीत FC Goaचा पराभव! कुठ्ठाळी व्हिलेजर्सने दिली 3-2 अशी मात

SCROLL FOR NEXT