Goa Drugs Case Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मुंबईतून ड्रग्ज आणून गोव्यात रेव्ह पार्ट्यांना पुरवायचा, पुण्याच्या तरुणाला अटक, 6.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Drugs Case: पुण्यातील एक तरुण ड्रग्स विकण्यासाठी गोव्यात आला होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी अटक केली.

Sameer Panditrao

पणजी: पुण्यातील एक तरुण ड्रग्स विकण्यासाठी गोव्यात आला होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी अटक केली. हे ड्रग्स तो मुंबईतून पुण्यात आणून ठेवायचा आणि गोव्यात शुक्रवारी येऊन शनिवारी-रविवारी किनारी भागात रेव्ह पार्ट्यांसाठी पुरवायचा, अशी धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

या तरुणाचे नाव कृष्णा सोनकेल्लू (वय २८ वर्षे, रा. दापोडी - पुणे) असून तो आंतरराज्य ड्रग्स रॅकेटशी संबंधित आहे. त्याच्याकडून ४५.५ ग्रॅम मेथाम्फेटामाईन ड्रग्स जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ६.८२ लाख रुपये असल्याची माहिती कक्षाच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली.

गोव्यात आठवड्याअखेरीस शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक संगीत नृत्यरजनी पार्ट्यांना येत असल्याने ड्रग्सला मोठी मागणी असते, हे लक्षात घेऊन राज्यात आठवड्याच्या अखेरीस ड्रग्स विक्रीसाठी पुण्यातून एक व्यक्ती येत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे या कक्षाने अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणेद्वारे या तरुणाचा शोध घेतला.

पोलिस कॉन्स्टेबल देवेश गोलतेकर, संजय गावकर, साईराज नाईक, विशाल शितोळे आणि महिला कॉन्स्टेबल ज्योती नाईक यांच्यासह पोलिस निरीक्षक साजित पिल्लई यांनी हा छापा टाकला. पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नेरलॉन अल्बुकर्क यांनी या छाप्यावर बारकाईने देखरेख ठेवून कारवाई केली.

त्याने ओळखली पर्यटकांची नाडी

शनिवार आणि रविवारी गोव्यात रेव्ह पार्ट्या होतात. त्यामध्ये पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची मागणी असते. त्यामुळे तो पर्यटकांना ड्रग्सचा पुरवठा करण्याचे काम गेले अनेक महिने करत होता. त्याने आणलेले ड्रग्स पार्ट्यांमध्ये पुरवठा करण्यापूर्वीच त्याला अटक केल्याने त्याचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आले. हे ड्रग्स परिणामकारक तसेच घातकही असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाळत ठेवून आवळल्या कृष्णाच्या मुसक्या

कृष्णा हा शुक्रवारी सकाळी गोव्यात आला आणि हरमल येथील एका गेस्ट हाऊसमध्ये उतरला होता. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, तो चोपडे येथे काही पार्ट्यांमध्ये ड्रग्सची विक्री करण्यास गेल्याचे कळल्यावर पोलिसांनी या भागात त्याचा शोध घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT