Mumbai Bomb Hoax Accused Arrested from Goa
वेर्णा: मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या कामगाराला बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई पोलिसांच्या पथकाने ज्या क्रमांकावरून कॉल आला होता तो ट्रॅक केला आणि त्याच्य लोकेशनची माहिती मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांआदिली. दोन राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयामुळे आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. आरोपी हा 40 वर्षांचा असून मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.
मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात सोमवारी निनावी फोनमुळे खळबळ उडाली. चेंबूर पोलीस ठाणे बॉम्बने उडवणर असल्याची धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. यात कॉल करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन गोव्यातील वेर्णा येथील असल्याचे उघड झाले. दुसरीकडे बॉम्ब शोधक नाशक पथकाने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेत शोधमोहीम राबवली. तपासाअंती कॉलमध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले.
मुंबई पोलिसांनी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास हा कॉल आला होता. मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती गोवा पोलिसांना दिली. गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आरोपीला वेर्णामधून अटक केली आणि त्याला कोलावळ पोलिसांच्या ताब्यात दिले. संध्याकाळी आठपर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केल्याने दोन राज्यांच्या पोलिसांची तत्परता आणि समन्वय याचं कौतुक होतं आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेला हा माणूस गेल्या चार वर्षांपासून गोव्यात कामाला होता, तिथे कुटुंबासह राहत होता.
सध्या आरोपी गोवा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली. आरोपी हा मूळचा कोल्हापूरचा असून गोव्यात तो कामगार आहे. चार वर्षांपासून गोव्यातील कुटुंबासह राहतोय.
काही दिवसांपूर्वी गोव्यातून अहमदाबाद येथे विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आल्यानंतर अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर या विमानाची आणि प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली. या प्रकारामुळे दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही विमानतळांवर बॉम्ब पडताळणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच धमक्यांबाबत चौकशी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.