Arrest Canva
गोवा

बंटी-बबली स्टाईलने गंडवणाऱ्या मुंबईतील दोघांना गोव्यात अटक, जाणून घ्या नेमकं काय केलं?

Online Fraud: रिसेल वेबसाइटच्या माध्यमातून मुंबई आणि गोव्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळ्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

रिसेल वेबसाइटच्या माध्यमातून मुंबई आणि गोव्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळ्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या दोघा भामट्यांना गोव्यातून अटक केली. आरोपी खरेदीदार आणि विक्रेता असल्याचे भासवून पीडितांना भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये घेऊन जायचे आणि नंतर त्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप घेऊन पसार व्हायचे.

दरम्यान, आरोपी अजान जेठवा आणि निधा शेख दोघेही मुंबईचे (Mumbai) रहिवासी आहेत. हे दोघे अशा अनेक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सहभागी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही बंटी आणि बबली स्टाईलसारखी टोळी तयार केली होती, जी रिसेल प्लॅटफॉर्मवर महागड्या गॅझेट्सची विक्री करुन पीडितांना लक्ष्य करत. त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून आरोपी एका दिवसासाठी एक अपार्टमेंट भाड्याने घेत असत, विक्रेत्याला ते त्यांचे स्वतःचे घर असल्याचे सांगून बोलावून घेत आणि नंतर त्याला डांबून त्याने खरेदी केलेल्या वस्तू घेऊन पळून जात.

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वात अलीकडील घटना 23 जून रोजी घडली जेव्हा आरोपींनी खार (पूर्व) येथे फ्लॅट भाड्याने घेतला. वेबसाइट ब्राउझ केल्यानंतर त्यांनी एका विक्रेत्याशी संपर्क साधला आणि आयफोन आणि लॅपटॉप खरेदी करण्यात रस दाखवला.

"आरोपींनी लोकेशन शेअर केल्यानंतर तक्रारदार फ्लॅटवर पोहोचला. आरोपींनी तक्रारदाराचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप हिसकावून घेत एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले. त्यानंतर ते तक्रारदाराला डांबून पसार झाले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, तपासादरम्यान निर्मल नगर पोलिसांना असे आढळून आले की गोव्यातील एका ठिकाणाहून वेबसाइटवर विक्रीसाठी तोच आयफोन सूचीबद्ध होता. खरेदीदार असल्याचे भासवणाऱ्या पोलिस पथकाने आरोपींशी संपर्क साधला, ज्यांनी त्यांना व्यवहारासाठी पणजीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गोवा पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. पोलिस उपायुक्त (झोन 8) आणि निर्मल नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींना चोरीचा फोन विकण्याचा प्रयत्न करताना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी दोघांकडून चोरीला गेलेला मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले. इतर पिडितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या फसवणुकीच्या नेटवर्कची संपूर्ण व्याप्ती उघड करण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT