Mumbai Margao Vande Bharat Train 
गोवा

कोकणवासीयांची गणेशोत्सवासाठी वंदे भारतला पसंती, जुलै, ऑगस्ट रिकामा; कसे कराल सेमी हायस्पीड ट्रेनचे बुकिंग?

Pramod Yadav

Mumbai Margao Vande Bharat Train: मुंबई - मडगाव वंदे भारत ट्रेनचे मंगळवारी (दि.27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्धाटन पार पडले. सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनमुळे मुंबई - गोवा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात यायला चाकरमान्यांनी आधुनिक आणि वेगवान वंदे भारत ट्रेनला पंसती दिली आहे.

वंदे भारतचे गणेशोत्सव काळातील बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र, जुलै, ऑगस्ट महिन्यातील ट्रेनच्या सीट रिकाम्याच आहेत. यासाठी बुकिंग धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसते.

Mumbai Margao Vande Bharat Train Booking

यावर्षी 19 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असतात. त्यासाठी सरकार दरवर्षी विशेष गाड्या देखील सोडत असते, दरम्यान वंदे भारत सुरू झाल्याने चाकरमान्यांनी या ट्रेनला पंसती दिली आहे. 18 आणि 20 सप्टेंबरला मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन हाऊस फुल झाली असून प्रतीक्षा यादीची सुरुवात झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, 29 जुलैपासून पुढे तपासले असता ट्रेनचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे दिसते. 30 जूनसाठी एक्सेकेटिव्ह चेअर कार (EC) 01 सीट उपलब्ध आहेत तर, एसी चेअर (CC) कारच्या 222 सीट उपलब्ध आहेत. तसेच 3 जुलैसाठी EC 21, CC 329, 5 जुलैसाठी EC 26, CC 365, 7 जुलैसाठी EC 04 आणि CC 322 सीट उपलब्ध आहेत.

असे करा वंदे भारत ट्रेनचे बुकिंग

आरसीटीसीच्या संकेस्थळावर तुम्ही मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनचे बुकिंग करू शकता. त्यासाठी आरसीटीसीच्या संकेतस्थळावर मडगाव ते मुंबई किंवा मुंबई ते मडगाव असा प्रवासाचा मार्ग निवडून प्रवासाचा दिवस निवडावा लागेल. त्यानंतर वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक आणि उपलब्ध सीटची माहिती दिसेल. त्यावर आरक्षणाचा प्रकार ठरवून तुम्हाला एक्सेकेटिव्ह चेअर कार (EC) आणि एसी चेअर (CC) कार असा पर्याय निवडून सीट आरक्षित करता येईल.

एक्सेकेटिव्ह चेअर कारसाठी (EC) 3,535 रूपये आणि एसी चेअर (CC) कारसाठी 1,970 रूपये मोजावे लागतील.

असे असेल पावसाळ्यातील वेळापत्रक

‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही देशातील सर्वांत जलद रेलगाडी असून मडगाव ते मुंबई हे अंतर केवळ साडेसात ते आठ तासांत पूर्ण करणार आहे. मात्र, पावसाळ्यात वेग मर्यादा लागू केल्याने आता ही गाडी 10 तास घेणार आहे.

  1. सोमवार, बुधवार व शुक्रवारी मुंबईहून सकाळी 5.32 वाजता ही एक्सप्रेस सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 3.30 वाजता मडगावला पोहोचेल.

  2. मडगावहून परतीचा प्रवास मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल व मुंबईला रात्री 10.20 वाजता पोहोचेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT