HC of Bombay at Goa On Domnic and Joan D'Souza Case Dainik Gomantak
गोवा

स्वत:च्या मालमत्तेत धार्मिक कार्यास मनाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; शिवोलीच्या 'त्या' चर्चवरील बंदी उठली

जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांच्या मागणीनंतर जुआन व डॉमनिक डिसोझा या दाम्पत्याला धार्मिक सभा घेण्यास बंदी घातली होती.

Pramod Yadav

HC of Bombay at Goa On Domnic and Joan D'Souza Case: स्वत:च्या मालमत्तेत धार्मिक कार्यास मनाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शिवोली येथील फोर पिलर्स या बिलीवर्स चर्चमध्ये धार्मिक सभा व कार्यक्रम घेण्यास घातलेली बंदी उठवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांच्या मागणीनंतर जुआन व डॉमनिक डिसोझा या दाम्पत्याला धार्मिक सभा घेण्यास बंदी घातली होती. न्यायालयाने शुक्रवारी बंदी उठवताना या निर्णायावर ताशेरे ओढले आहेत.

स्वत:च्या मालमत्तेत धार्मिक कार्यास मनाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. पुराव्यांची शहनिशा न करताच अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अशाप्रकारचे आदेश देत आहेत. अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांचा समावेश असलेल्या गोवा खंडपीठाने धर्म परिवर्तनाचा आरोप असलेल्या ख्रिश्चन जोडप्याविरुद्ध जिल्हा दंडाधिकार्‍यांनी CrPC कलम 144 अन्वये दिलेला आदेश रद्द केला आहे.

जुआन व डॉमनिक डिसोझा या दोघांविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचा अहवाल पोलिस अधिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होता. याचिकाकर्त्या आणि तिच्या पतीला खाजगी मालमत्तेत, कायद्याच्या मर्यादेत राहून धार्मिक कार्य करण्याचा अधिकार आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे.

शिवोली येथील फोर पिलर्स या बिलीवर्स चर्चमध्ये धर्मांतर केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत पोलिस अधीक्षकांनी तक्रारींचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामी हागे यांनी 28 डिसेंबर 2022 कलम 144 अंतर्गत फोर पिलर्स या बिलीवर्स चर्चमध्ये धार्मिक सभा व कार्यक्रम घेण्यास घातलेली बंदी घातली.

याप्रकरणी निर्णय देताना स्वत:च्या मालमत्तेत धार्मिक कार्यास मनाई मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हणत बिलीवर्स चर्चवरील बंदी उठवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

Zoho Mail: Gmail, Yahoo विसरा आता देशी ई-मेल वापरा; झोहोवर वैयक्तिक आणि बिझनेस मेल कसा तयार कराल? Step By Step प्रोसेस

SCROLL FOR NEXT