Mumbai Goa Vande Bharat Train Update  Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Vande Bharat Train : ‘वंदे भारत’ स्थगित; मडगाव-मुंबई मार्गावरील सेवा अनिश्र्चित

बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात होऊन शेकडो लोक मत्युमुखी पडले

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mumbai Goa Vande Bharat Train : मडगाव-मुंबई रेल्वे मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. बालासोर येथील रेल्वे अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर ‘वंदे भारत’ रेल्वेची ही सेवा अनिश्र्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात होऊन शेकडो लोक मत्युमुखी पडले, तर कित्येक जण गंभीर जखमी झाल्यामुळे शनिवारी मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शनिवारी आयोजित केलेला शुभारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

नंतर ही एक्सप्रेस 5 जूनपासून मुंबई-मडगाव व परत या मार्गावर नियमितपणे सुरू होईल, असे सांगण्यात आले. पण आता वंदे भारत एक्सप्रेसचे या मार्गावर धावणे अनिश्र्चित काळासाठी स्थगित केल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी आज, रविवारी सांगितले.

निर्णय घेणे अवघड

ओडिशातील रेल्वे अपघाताचा परिणाम एवढा भयंकर झाला आहे की, त्यामुळे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मुंबई-मडगाव मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्सप्रेस एवढ्या लवकर सुरू करण्याच्या निर्णयाप्रत आलेले नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT