Mumbai Goa Vande Bharat Train Flagg Off Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Vande Bharat Train Flagg Off: ...अन् मडगाव येथून मुंबईच्या दिशेन धावली 'वंदे भारत' ट्रेन

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

Pramod Yadav

Mumbai Goa Vande Bharat Train Flagg Off: मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी अकरा वाजता मोदींनी मुंबई-गोवासह इतर चार वंदे भारत एक्सप्रेसला गाड्यांचा शुभारंभ केला.

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. उद्घाटन होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ट्रेनचे स्वागत करण्यात आले. मडगाव स्थानकावर यावेळी उत्साही वातावरण होते.

यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, खासदार फ्रान्‍सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित होते.

मडगाव रेल्वेस्थानक पंचातारांकित व्हावे अशी मागणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. येत्या काही वर्षात मडगाव स्थानकाचे रूपडे बदलणार अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली.

वंदे भारत ट्रेनचे तीन जून रोजी उद्घाटन केले जाणार होते. दरम्यान, ओडिशा येथे झालेल्या भीषण ट्रेन अपघातामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. तीन जूनच्या उद्घानानंतर पाच जून पासून वंदे भारत ट्रेन नियमित धावणार होती मात्र, आजपासून तिचा शुभारंभ होणार आहे.

पावसाळ्यामुळे ट्रेनची वेग मर्यादा कमी करण्यात आली असून, या ट्रेनला मुंबई ते गोवा अंतर पूर्ण करण्यासाठी आता आठ तास नव्हे तर दहा तास लागतील. तसेच, सुरूवातीला आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन धावणार होती मात्र, आता केवळ तीन दिवस ट्रेन धावणार आहे.

असे असेल पावसाळ्यातील वेळापत्रक

‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही देशातील सर्वांत जलद रेलगाडी असून मडगाव ते मुंबई हे अंतर केवळ साडेसात ते आठ तासांत पूर्ण करणार आहे. मात्र, पावसाळ्यात वेग मर्यादा लागू केल्याने आता ही गाडी 10 तास घेणार आहे.

  1. सोमवार, बुधवार व शुक्रवारी मुंबईहून सकाळी 5.32 वाजता ही एक्सप्रेस सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 3.30 वाजता मडगावला पोहोचेल.

  2. मडगावहून परतीचा प्रवास मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल व मुंबईला रात्री 10.20 वाजता पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT