Mumbai-Goa Vande Bharat Express  Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Vande Bharat Express : मडगाव स्थानकात आज ‘वंदे भारत'चा होणार शुभारंभ

‘वंदे भारत एक्सप्रेस’ सध्या पावसाळ्यात तीनच दिवस धावणार आहे

दैनिक गोमन्तक

Madgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. २७) सकाळी 10 वाजता भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशनवर व्हिडिओ कॉन्फरन्‍सिंद्वारे मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेलगाडीला हिरवा बावटा दाखवणार आहेत.

त्यानंतर ते धारवाड-बेंगळुरू, रांची-पाटणा, राणी कमलापती-जबलपूर व राणी कमलापती-इंदोर या मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्सप्रेस गाड्यांना हिरवा बावटा दाखवून शुभारंभ करतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव मार्गावरील ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून सहा दिवस धावणार असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते, परंतु सध्या पावसाळ्यात ही एक्सप्रेस तीनच दिवस धावणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर सकाळी 9 वाजता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, खासदार फ्रान्‍सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुंबई-गोवा प्रवास केवळ आठ तासांत

  1. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही देशातील सर्वांत जलद रेलगाडी असून मडगाव ते मुंबई हे अंतर केवळ साडेसात ते आठ तासांत पूर्ण करणार आहे. मात्र, पावसाळ्यात वेग मर्यादा लागू केल्याने आता ही गाडी १० तास घेणार आहे.

  2. सोमवार, बुधवार व शुक्रवारी मुंबईहून सकाळी ५.३२ वाजता ही एक्सप्रेस सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल.

  3. मडगावहून परतीचा प्रवास मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुरू होईल व मुंबईला रात्री १०.२० वाजता पोहोचेल.

"‘वंदे भारत एक्सप्रेस’ला आठ डबे असून ती थिवी, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे व दादर या स्थानकांवर थांबणार आहे. एका डब्यात ७० आसनांची व्यवस्था आहे. सर्व डबे वातानुकूलित व सर्व सुखसोयींनी उपयुक्त व आरामदायी असणार आहेत."

- बबन घाटगे, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT