Mumbai-Goa Tejas Express 
गोवा

Mumbai Goa Train: 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हाला गोव्याला जाण्याचा मोह आवरणार नाही, किती येतो खर्च? जाणून घ्या

Mumbai-Goa Tejas Express: तेजस एक्सप्रेसमध्ये व्हिस्टा डोम जोडण्यात आला असून, त्यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

Pramod Yadav

मान्सूनमध्ये मुंबई- गोवा ट्रेन प्रवास हा प्रवाशांसाठी एक पर्वणीच म्हटली पाहिजे. कोकणातील निसर्ग अनुभवत गोव्यात पोहोचायचे आणि गोव्यातील जंगलातील भटकंती केल्यानंतर मेंदू 'रिचार्ज' झालाच पाहिजे. गोव्याला जाण्यासाठी मुंबईतून नेहमीच्या ट्रेनशिवाय वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस धावतात. नव्याने सुरु केलेल्या वंदे भारत ट्रेनला पसंती मिळत असातानाच तेजस आणि मडगाव जनशताब्दीमधील विस्टा डोम प्रवाशांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

तेजस एक्सप्रेस आणि मुंबई- मडगाव जनशताब्दीमध्ये विस्टा डोम जोडण्यात आला असून, त्यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ३६० अंशात फिरणाऱ्या आराम खुर्च्यांसह, पारदर्शक छत, मोठ्या खिडक्या यामुळे प्रवाशांना निसर्ग अनुभवता येतो. याशिवाय जिभेचे चोचले पुरवण्यासाठी प्रवासादरम्यान मिळणारा नाश्ता, जेवण आणि हाय टी आहेच. या सर्वांचा खर्च तिकीटात समाविष्ट असतो.

पावसाळ्यात या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. याचे कारण असे की पावसाळ्यात कोकणातील निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य अधिक खुलते. यासाठीच रेल्वेने सहा वर्षांपूर्वी मुंबई- गोवा मार्गावर विस्टा डोम कोचचा प्रयोग केला होता. प्रवाशांची वाढती मागणी पाहता काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्यावतीने या ट्रेनमध्ये आणखी एक विस्टाडोम जोडण्यात आला आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसचे वेळापत्रक Mumbai Madgaon Jan Shatabdi express time table ticket price

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव (गोवा)

गाडीक्रमांक - 12051

CSMT - सकाळी ५ वाजून १० मिनिट

Madgaon - संध्याकाळी साडे चार वाजता

तिकीट दर - २, ४९५ रुपये

मडगाव (गोवा) ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

गाडीक्रमांक - 12052

Madgaon - दुपारी १२ वाजता

CSMT - रात्री ११ वाजून ५५ मिनिटे

तिकीट दर - २, ४९५ रुपये

तेजस एक्स्प्रेसचे वेळापत्रक (Mumbai Goa Tejas Express Time Table ticket price)

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव (गोवा)

वार - मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी

गाडीक्रमांक - 22119

CSMT - सकाळी ५ वाजून ५० मिनिटे

Madgaon - संध्याकाळी पाच वाजता

तिकीट दर - ३, ३२० रुपये आणि ३,४५० रुपये

मडगाव (गोवा) ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

गाडीक्रमांक - 22120

वार - सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी

Madgaon - दुपारी १२ वाजून ५० मिनिटे

CSMT - रात्री १२ वाजून ५ मिनिटे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT