Mumbai Goa police 
गोवा

RDX असलेला टँकर येत होता गोव्याच्या दिशेने, मुंबई पोलिसांच्या माहितीनंतर रत्नागिरीत कारवाई

एका व्यक्तीने आरडीएक्स गोव्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.

Pramod Yadav

RDX असलेला टँकर गोव्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांना दिली. सतर्कतेचा इशारा म्हणून गोवा पोलिसांनी राज्याच्या सीमेवर मोठी नाकाबंदी केली. दरम्यान, हा टँकर रत्नागिरी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरडीएक्स विस्फोटक असलेला एक टँकर गुजरात येथून गोव्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती फोनद्वारे गोवा पोलिसांना दिली. पोलिसांनी सतर्कतेचा इशारा म्हणून सीमेवर नाकाबंदी केली.

हा टँकर रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे. एका व्यक्तीने आरडीएक्स गोव्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. त्यानंतर गोवा आणि कोकणातील पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

टँकरमध्ये आढळली नाहीत स्फोटके

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या टँकरमध्ये प्रथमदर्शनी कोणत्याही प्रकराची स्फोटके आढळून आलेली नाहीत. ज्या व्यक्तीने फोनवरून याबाबत माहिती दिली ती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT