California’s Pacific Highway 
गोवा

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

Mumbai-Goa Marine Super Highway: मरीन गोवा सुपरहायवे चारपदरी असेल, कॅलिफोर्निया पॅसिफीक महामार्गाच्या धर्तीवर याची निर्मिती केली जाणार आहे.

Pramod Yadav

Mumbai-Goa Marine Super Highway

मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम गेल्या बारा वर्षापासून रखडले असताना, महाराष्ट्र सरकारने मुंबई- गोवा मरीन सुपरहायवेची घोषणा केली आहे.

कॅलिफोर्निया पॅसिफीक महामार्गाच्या धर्तीवर नव्या महामार्गाची निर्मिती केली जाणार असून यासाठी 26,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मनमोहक समुद्रकिनारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगातून हा महामार्ग जाणार आहे.

मरीन सुपरहायवेला झालेल्या विलंबानंतर अखेर या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सध्याच्या मुंबई - गोवा महामार्गाच्या जवळून नवीन मरीन सुपरहायवे जाणार आहे. कोकणातील पर्यटन स्थळातून जाणारा सुमारे ५०० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल.

यात २७ किलोमीटर लांबीच्या सात पुलांचा समावेश आहे. सध्याच्या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या प्रमुख हेतू सुपरहायवेच्या निर्मितीमागे आहे. शिवाय या सुपरहायवेमुळे पर्यटन आणि वाणिज्य क्षेत्राला देखील मोठा लाभ होणार आहे.

मरीन गोवा सुपरहायवे चारपदरी असेल, कॅलिफोर्निया पॅसिफीक महामार्गाच्या धर्तीवर याची निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक, पर्यटक आणि नियमित प्रवाशांना या महामार्गाचा फायदा होईल.

असा असेल मुंबई- गोवा मरीन सुपरहायवे

मुंबई - रेवास - अलिबाग - काशिद - मुरुड - हरिहरेश्वर - गुहागर - गणपतीपुळे - रत्नागिरी - देवगड - मालवण - तेरेखोल

महामार्गावरील सात पूल

धरमतर खाडी - धरमतर खाडीवर सुमारे दहा किलोमीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे.

कुंडलिका खाडी - कुंडलिका खाडीत देखील ३.८ किमी लांबीचा पूल उभारला जाणार आहे. हा पूल रेवदांडा आणि साळव यांना जोडेल.

आगरदांडा खाडी - आगरदांडा खाडीत ४.३ किलोमीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे.

बाणकोट खाडी - बाणकोट खाडीत १.७ किमी लांबीचा पूल उभारला जाईल.

केळशी - केळशीत ६७० मीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे.

जयगड खाडी - जयगड खाडीत ४.४ किलोमीटर लांबीचा केबल पूल उभारला जाणार आहे. या पूलामुळे प्रवासाचा वेळ कमी होणारच आहे शिवाय प्रवासात निसर्गरम्य दृष्याचा आनंद देखील घेता येणार आहे.

कुणकेश्वर पूल - कुणकेश्वर येथे देखील १.६ किलोमीटर लांबीचा केबल पूल उभारला जाणार आहे.

मुंबई- गोवा मरीन सुपरहायवेचा फायदा कसा होणार?

१) नव्या मुंबई- गोवा मरीन सुपरहायवेमुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. प्रवाशांना नव्या मार्गाचा पर्याय उपलब्ध होईल.

२) सुपरहायवेमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. यामुळे स्थानिकांनाही फायदा होईल. स्थानिकांना रोजगार आणि व्यावसाय संधी निर्माण होईल.

३) दळवळणाचा पर्याय उपलब्ध झाल्याने कोकणातील वाणिज्य, शेती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.

४) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्माण होणारा सुपरहायवे अनेकार्थाने फायदेशीर ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: गोव्याचा सन्मान! बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस पुरस्काराने गौरव

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT