Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: 5 जानेवारीला मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट

रायगड जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर 5 जानेवारीला वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिवशी रायगड जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्यासह सुमारे 75 हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमासाठी सुमारे 75 हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यांच्या वाहतुकीसाठी दोन हजार बसेस आणि इतर वाहनांची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी रोजी दुपारी 12 पासून ते रात्री 11 पर्यंत अत्यावश्यक सेवा सोडता अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

कार्यक्रमासाठी दोन हजार बसेस आणि इतर वाहने येणार असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

यादिवशी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते 10 या कालावधीत गोवा मार्गे येणारी वाहने मोरबे मार्गे वळविण्यात येणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT