Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: जायचं होतं एकीकडे, पोहोचला भलतीकडे!!मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलकांची गरज

Signboards at Mumbai-Goa Highway: व्यवस्थित दिशादर्शक फलक नसल्याने चालकांची दिशाभूल होतेय आणि परिणामी अपघातांमध्ये वाढ झाली आहे

Akshata Chhatre

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरांचे काम सुरु आहे. पळस्पे ते इंदापूर इथे काम सध्या पहिल्या टप्प्यात आहे आणि व्यवस्थित दिशादर्शक फलक नसल्याने चालकांची दिशाभूल होतेय आणि परिणामी अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

काम सुरु असलेल्या ठिकाणी पिवळे-पांढरे पट्टे लावणं, गतिरोधकांवर रिफ्लेक्टर आणि रस्त्यावर मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावणं महत्वाचं आहे, मात्र अद्याप याची खबरदारी घेतलेली नाही. पेण येथे वाहनांची सतत रहदारी सुरु असते मात्र इथे दिशादर्शक फलक नसल्याने चालक गोंधळतात आणि पुढे निघून जातात, म्हणूनच इथे दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी केली जातेय.

दिशादर्शक फलक बसवल्याने वाहन चालकांना महत्वाची गावं किंवा ठिकाणांची योग्य माहिती मिळेल, ते गडबडून जाणार नाहीत किंवा अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल.

या प्रश्नावर बोलताना सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु असून पळस्पे ते इंदापूर येथील महत्वाच्या ठिकाणी लवकरच दिशा दर्शविणारे फलक लावले जातील. संबंधित कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यशवंत घोटकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT