Raj Thackeray | Mumbai-Goa Highway  Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: 'मुंबई गोवा महामार्गासाठी आता मनसेचा एल्गार...', राज ठाकरे यांच्या सभेकडे लक्ष

मनसे नेते राज ठाकरे यांचा 16 ऑगस्ट रोजी याप्रकरणी पनवेल येथे निर्धार मेळावा होणार आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावरील खड्यांची समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे. राजयकीय नेते, स्थानिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवून देखील यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाहीये. पण, मुंबई गोवा महामार्गासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एल्गार... पुकारला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांचा 16 ऑगस्ट रोजी याप्रकरणी पनवेल येथे निर्धार मेळावा होणार आहे. या सभेत मुंबई गोवा महामार्गाबाबत पक्षाची भुमिका जाहीर केली जाईल असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज ठाकरे पनवेल येथील सभेत मुंबई - गोवा महामार्गावरील खड्यांचा विषय मांडतील. शिवाय महामार्गाचे काम मागील 12 वर्षापासून रखडले आहे त्यावर ते भाष्य करतील अशी चर्चा आहे.

कोकणी स्वाभिमानाला आता 'राज'भाषेची धार, कोकणच्या नवनिर्माणासाठी 'मनसे' निर्धार !, "रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी" निर्धार मेळावा.. आणि मुंबई-गोवा महामार्गासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एल्गार... कोकणी स्वाभिमानाला आता 'राज'भाषेची धार, कोकणच्या नवनिर्माणासाठी 'मनसे' निर्धार !

अशा टॅगलाईन वापरून सध्या मनसे राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याची जाहिरात करत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील राजकीय वातावरण पाहता महानगरपालिकेच्या निवडणूका होतील असे चित्र नाही. त्यामुळे लोकसभेबाबत रणनीती ठरवण्यासाठी हा मेळावा असल्याचे राज यांनी सांगितले.

त्यामुळे या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना राज काय मंत्र देणार तसेच, मुंबई गोवा महामार्गाबाबत काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेने वारंवार मुंबई-गोवा महामार्गावरील खड्यांचा विषय उचलून धरला होता. मनसेच्या सोशल मिडिया हॅन्डलवर महामार्गावरील खड्यांबाबत मजेशीर मीम्स व्हायरल झाले.

गणपतीपूर्वी एक लेन सुरू होणार

मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन गणपतीपूर्वी सुरू करण्याचा मानस महाराष्ट्र सरकारने व्यक्त केला आहे. एक लेन सुरू झाल्यास मुंबई-गोवा प्रवासाचा वेळ एक ते दीड तासाने कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

SCROLL FOR NEXT