Mumbai-Goa Highway Condition Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्ग बनला चिखलमय; अपघात होण्याची शक्यता

अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकल्याने पहिल्याच पावसाळ्यात रस्ता चिखलमय झाला आहे.

दैनिक गोमन्तक

मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकल्याने पहिल्याच पावसाळ्यात रस्ता चिखलमय झाला आहे.

यामुळे महामार्गावर गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिपळूण शिवाजीनगर परिसरात रस्त्यावर मंगळवारी दुपारी चार दुचाकी घसरल्या. त्यामध्ये तीन दुचाकी महाविद्यालयीन युवकांच्या होत्या.

कोकणात आता पाऊस सुरू झाल्याने आधीच अपघात होण्याची संभावना जास्त असते, त्यात रस्त्याच्या कामासाठी मातीचे भराव टाकल्याने यामध्ये अधिकच भर पडत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना शहरात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी अंतर्गत सर्व्हिस रोड तयार केले जात आहेत. पण चिखलमय रस्त्यांवर प्रवास करणे नागरिकांसाठी अवघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT