Mumbai-Goa Cordelia Cruz Case| Munmun Dhamecha Instagram
गोवा

Mumbai-Goa Cordelia Cruz Case: कॉर्डेलिया क्रूझ प्रकरण; मॉडेल मुनमुनला थायलंडला जाण्याची परवानगी

मुनमुनला ऑक्टोबर 2021 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांसह NCB क्रूझवर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती.

Pramod Yadav

Mumbai-Goa Cordelia Cruz Case: मुंबईतील विशेष न्यायालयाने 2021 च्या कॉर्डेलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी मॉडेल मुनमुन धमेचाला फोटोशूटसाठी थायलंडला जाण्याची परवानगी दिली आहे.

मुनमुनला ऑक्टोबर 2021 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई समुद्रकिनाऱ्याजवळील क्रूझवर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात एनसीबीने आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र मुनमुन धामेचा आणि इतर आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी.वाय. फड यांनी अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांवर सुनावणी करताना गेल्या आठवड्यात धामेचाला मागणीनुसार 26 ते 31 जानेवारी दरम्यान थायलंडला जाण्याची परवानगी दिली.

दरम्यान, मुनमुनला परदेशात जाण्यापूर्वी तिचा प्रवास कार्यक्रम न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय परदेशातून परत येताच कोर्टात हजेरी नोंदवण्यासही सांगितले आहे.

मुनमुन मध्यमवर्गीय कुटुंबातून आली असून, मॉडेलिंग हेच तिच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. बऱ्याच दिवसांनी तिला थायलंडमधील फुकेत येथे फोटोशूटची असाइनमेंट मिळाली. त्यामुळे तिला परदेशात जाणे आवश्यक आहे, असे मुनमुन धमेचाचे वकील शिरीष शिगवान यांच्यामार्फत कोर्टात सांगितले.

मात्र, विशेष सरकारी वकील अमित मुंडे यांनी एनसीबीच्या वतीने धमेचा यांच्या याचिकेला विरोध करत अर्जात सत्यता नसल्याचे म्हटले. गुन्हा गंभीर असून अर्जदाराला परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास ती फरार होऊ शकते. यामुळे खटल्याला विलंब होऊ शकतो, असे मुंडे यांनी म्हटले.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने धामेचा यांची याचिका मान्य केली. दरम्यान, धामेचा यांची मुक्तता याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेत त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या प्रकरणाशी साम्य साधण्याची विनंती केली होती, ज्याला एनसीबी एसआयटीने क्लीन चिट दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT